News Flash

‘या’ अजब कारणामुळे शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

शिल्पाला हा फ्लॅट तिच्या पतीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून दिला होता. मात्र, तिला पाहिजे तसा हा फ्लॅट नव्हता म्हणून तिने विकला.

आज शिल्पाचा ४६ वा वाढदिवस आहे. (Photo Credit : Shilpa Shetty)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे. शिल्पा आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करतं आहे. शिल्पा तिच्या लूक्स आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. शिल्पाला तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक भेट मिळतात. मात्र, काही वर्षांपूर्वी शिल्पाला पती राज कुंद्राने दुबईतील बुर्ज खलिफामध्ये एक फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला होता. मात्र, शिल्पाने तो फ्लॅट विकला.

राज कुंद्राने शिल्पाला २०१० मध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलीफाच्या १९ व्या फ्लोअर वर ५० कोटींचा एक फ्लॅट भेट म्हणून दिला होता. मात्र, काही दिवसांनी शिल्पाने तो फ्लॅट विकला. कारण त्या फ्लॅटमध्ये जागा कमी होती आणि त्या फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांचा मुलगा विवानला त्रास व्हायचा कारण त्याला मोकळ्या जागेत रहायलं आवडतं.

शिल्पा आणि राजने २००९ मध्ये लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. विवान त्यांच्या मुलाचे नाव आहे तर समीक्षा त्यांच्या मुलीचे नाव आहे.

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

शिल्पाने लिम्काच्या जाहिरातीतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर , १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाजिगर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शिल्पासोबत शाहरुख आणि काजोल मुख्य भूमिकेत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:55 pm

Web Title: because of this reason shilpa shetty sold the 50 crore flat in burj khalifa dcp 98
Next Stories
1 अभिनेत्री माही विजच्या भावाचे निधन
2 एकता कपूरची ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर दिव्या खोसला कुमारचा नवा खुलासा
3 वयाच्या ८५ व्या वर्षी वॉटर एरोबिक करतानाचा धर्मेंद्र यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X