News Flash

रणवीरचे आठ अॅब्स पाहिलेत का?

मेहनती कलाकार म्हणून रणवीरची बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख आहे.

रणवीरच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेस आणि उत्साही प्रवृत्तीचेही कौतुक केले जाते.

बॉलीवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगबाबत बोलायचं झालं तर त्याच्या व्यक्तीमत्त्वातील अनेक गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. एखाद्या कठीण भूमिकेचे आव्हान स्विकारून त्या भूमिकेला न्याय देणे असू दे किंवा आपल्या वैयक्तीक आयुष्यात प्रामाणिक प्रियकराची भूमिका असू देत, या सर्व बाबतीत रणवीरचे चाहते त्याचे कौतुक करताना पाहायला मिळतात. रणवीरच्या अभिनयासोबतच त्याच्या फिटनेस आणि उत्साही प्रवृत्तीचेही कौतुक केले जाते. एक मेहनती कलाकार म्हणून रणवीरची बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख आहे. सध्या रणवीर बेफिक्रे या आपल्या आगामी चित्रपटात फीट दिसण्यासाठी जिममध्ये भरपूर मेहनत घेत आहे आणि याबाबतचे अपडेट्स देखील तो आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनत देताना दिसतो. नुकतेच रणवीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जिममध्ये टीपलेले एक अप्रतिम छायाचित्र शेअर केले असून, छायाचित्रात रणवीरचे आठ अॅब्स पाहायला मिळतात. रणवीरच्या या छायाचित्राला भरभरून लाईक्स मिळत आहेत. याशिवाय, रणवीरने ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रणवीर अॅब्सशी निगडीत व्यायाम करताना दिसतो. हे ट्विट्स रणवीरने आपल्या जिम ट्रेनरला म्हणजेच लॉयड स्टिव्हन्सला मेन्शन केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 7:55 pm

Web Title: beneath the male bravado there is a ranveer singh screaming for nutella
Next Stories
1 अपघाताने झालो अभिनेता- दिलजीत दोसांझ
2 VIDEO: मानसी नाईकच्या ‘पिके’ला प्रेक्षकांची पसंती..
3 प्राप्तिकर विभागाची शाहरुख खानला नोटीस
Just Now!
X