टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फीमेल कॉमेडियन भारती सिंह आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. विनोदी अभिनेत्री भारती सिंहने मनोरंजन विश्वात मोठं यश कमावलं आहे. आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह हिला खाजगी आयुष्यात मात्र अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. तिचा जन्म पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला असून लहानपण खूपच गरिबीत गेलंय. अनेकांचं हृदय हेलावून जाईल अशा घटना तिच्या आयुष्यात घडल्यात. आईच्या पोटात असतानाच तिचे आई-वडील गर्भपात करणार होते. इतकंच नव्हे तर भारती सिंहने ज्यावेळी कॉमेडियन बनण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी तिला वाळीत टाकलं होतं.

भारती सिंह अवघ्या दोन वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आईने गर्भपाताचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर तिने तो बदलला आणि मला जन्म दिला, असं भारतीने अनेकदा शोमध्ये बोलताना सांगितलंय. वडिलांच्या निधनानंतर सिंगल मदर बनत तिच्या आईने भारतीला लहानाचं मोठं केलं. त्यावेळी तिची आई लोकांच्या घरी जाऊन घरकाम करून पैसे कमवायची आणि घर चालवायची. त्यावेळी भारती सुद्धा तिच्या आईसोबत काम करण्यासाठी जात होती.

When-Bharti-Singh's-relatives-boycotted

 

नातेवाईकांनी वाळीत टाकलं होतं

लोकप्रिय शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये बोलताना भारती सिंहने सांगितलं होतं की, “शोसासाठी माझी निवड झाली आणि त्यासाठी मी मुंबईमध्ये येण्याची तयार करत होती. हे ऐकून माझ्या नातेवाईकांनी मला वाळीत टाकलं. ‘हिला वडील नाहीत, ही काय काम करतेय, लोकांना हसवतेय’, असं म्हणत हिणवत होते. हिचं लग्नंच होणार नाही, असं देखील कित्येकदा बोलून गेले होते.” या शोनंतर तिचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. या शोमध्ये भारतीने ‘लल्ली’ नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत ‘लाफ्टर क्वीन’ म्हणून राज्य करत आहे.

ड्रग्ज प्रकरणात अडकली होती

भारती सिंह २०२० रोजी ड्रग्स प्रकरणात अडकली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अॅंगलने तपास करणाऱ्या एनसीबीनं भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया या दोघांना अटक केली होती. एनसीबीनं त्यांच्या घरी धाड टाकली होती. यावेळी तिच्या घरात ८६.५ ग्रॅम ड्रग्ज आढळून आले होते. भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया या दोघांना न्यायदंडाधिकारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकेकाळी उपाशी पोटी झोपणारी भारती आज जवळपास १०.९३ कोटी संपतीची मालक आहे. २०१९ मध्ये फोर्ब्सच्या यादीमध्ये भारती सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये ८२ व्या स्थानावर होती.