News Flash

“मग जरा पेट्रोलच्या दरावर लिहा”; ‘त्या’ ट्वीटनंतर बिग बी अमिताभ बच्चन ट्रोल

बिग बींनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलंय.

(File Photo-Amitabh Bachchan)बिग बींचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन वयाच्या ७८ व्या वर्षी जितके अभिनयात सक्रिय आहेत तितकेच सक्रिय ते सोशल मीडियावर देखील आहेत. बिग बींचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. बिग बी अमिताभ बच्चन वेगवेगळ्या मुद्यांवर कायम ट्वीट करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मात्र बिग बींनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलंय.

अमिताभ बच्चन यांनी १७ जुलैला एक ट्वीट केलंय. यात ते म्हणाले, “लिहायला काही नाही”. बिग बींच्या या ट्वीटवर त्यांना सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलंय. अनेकांनी बिग बींना जर लिहायला काही नसेल तर त्यांनी काय लिहावं हे सुचवंल आहे. एक युजर म्हणाला, “मग पेट्रेलबद्दल लिहा.”

बिग बी अमिताभ बच्चन यांनी २०१२ सालात पेट्रोलच्या दरवाढीवरू एक मजेशीर पोस्ट लिहिली होती. या जुन्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत काहींनी त्यांना ट्रोल केलंय. युजर म्हणाला, “हो नक्कीच लिहिण्यासाठी आहे. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर यावेळी पेट्रोलवर काही बेधडक लिहून दाखवा.”

तर आणखी एक युजर म्हणाला, “२०१३ सालात मोदीजींनी जितके पैसे तुम्हाला पेट्रोलवर ट्वीट करण्यासाठी दिले होते. त्याहून दुप्पट आम्ही सर्व भारतीय तुम्हाला देऊ. रोज फक्त पेट्रोलचा दर ट्वीट करा.”

दरम्यान कामाबद्दल सांगायचं झालं तरबिग बी लवकरच ‘चेहेरे’ या सिनेमात झळकणार आहेत. हा सिनेमा तयार असून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. याशिवाय नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ या सिनेमातही ते झळकणार आहेत. तसचं ब्रह्मास्त्र, मेडे और गुडबाय या सिनेमाच्या प्रोजेक्टवर ते काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 11:27 am

Web Title: big b amitabh bachachan brutally trolled after he share tweet people said write on petrol rate kpw 89
Next Stories
1 “तुझे हात सापळ्यासारखे दिसतात” म्हणणाऱ्या ट्रोलरला छवि मित्तलचं उत्तर; म्हणाली “एक महिला असून…”
2 “शोच्या वेळी लोक विचित्र पद्धतीने स्पर्श करायचे”; कॉमेडियन भारती सिंहने शेअर केल्या ‘त्या’ कटू आठवणी
3 “स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या… ही स्त्री जातीची शोकांतिका”; गरोदरपणावरुन ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीनं सुनावलं
Just Now!
X