27 November 2020

News Flash

Bigg Boss Marathi 2 : घरात पुन्हा होणार नवा ग्रुप, शिवानीने आखली योजना ?

तिच्या खेळामध्ये पूर्वीसारखाच उत्साह दिसून येत आहे

शिवानी सुर्वे

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व चांगलेच गाजत आहे. घरात नवनवीन टास्क रंगत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने बिग बॉसचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. यंदाचं पर्व विशेष गाजत असून सध्या घरात आणि प्रेक्षकांमध्ये शिवानी सुर्वेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवानीने पुन्हा एकदा घरात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे तिच्या येण्यामुळे या खेळालं नवं वळण मिळालं आहे. त्यातच आता घरामध्ये पुन्हा एकदा ग्रुप होण्यास सुरुवात झाली आहे.

शिवानीने अचानकपणे घरात प्रवेश केल्यामुळे घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. घरामध्ये आल्या आल्या शिवानीने तिचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. तिच्या खेळामध्ये पूर्वीसारखाच उत्साह दिसून येत आहे. घरामध्ये आल्यानंतर तिने माधवला मैत्रीचा सल्ला दिला, तर नेहाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. इतकंच नाही तर वीणालादेखील काही गोष्टींची समज दिली आहे. त्यातच आता शिवानी नवा ग्रुप करण्याचा मार्गावर आहे. तिचे हे विचार तिने किशोरी शहाणे आणि रुपालीसमोर बोलूनही दाखविले आहेत.

नुकत्याच झालेल्या भागामध्ये तिने किशोरी आणि रुपालीला आपण सारे जण एक ग्रुप करुन खेळून शकतो, असं सुचविलं आहे. तिच्या या नव्या ग्रुपमध्ये ती, रुपाली, नेहा, माधव, किशोरी आणि हिना यांचा समावेश आहे. मात्र जरी गृप केला तरी टास्क खेळतांना स्वतंत्र रहायचं हेदेखील तिने कटाक्षाने साऱ्यांना सांगितलं.

दरम्यान, शिवानीने तिचे हे विचार मांडल्यानंतर किशोरी आणि रुपाली यांनीही त्यांचे मत मांडले आहे. त्यामुळे आता घरामध्ये हा नवा ग्रुप तयार होणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2019 5:09 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani surve new group ssj 93
टॅग Bigg Boss Marathi
Next Stories
1 शब्दांपलीकडलं अबोल नातं सांगणारा संजय दत्तचा ‘बाबा’; पाहा ट्रेलर
2 कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आलियाने मागितली ही गोष्ट
3 गुरुपौर्णिमेनिमित्त हृतिक पोहोचला बिहारला, घेतली आनंद कुमार यांची भेट
Just Now!
X