23 November 2020

News Flash

Bigg Boss Marathi 2 : WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत !

आज कोण पडणार घरातून बाहेर, तर कोण होणार सेफ

मोठ्या उत्साहात सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील पहिली एलिमनेशन प्रक्रिया आज पार पडणार आहे. घरातील पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगताप, मैथिली जावकर, माधव देवचक्के आणि नेहा शितोळे हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे बघणे प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे. पराग सेफ झोनमध्ये तर अभिजीत केळकर डेंजर झोनमध्ये असल्याचे महेश मांजरेकर यांनी काल WEEKEND चा डाव मध्ये सांगितले.

आज अभिजीत बिचुकले आणि सुरेखाताई पुणेकर यांच्यामधील संभाषणामुळे कार्यक्रमामध्ये बरीच रंगत येणार आहे. महेश मांजरेकर यांनी बिचुकले यांना सुरेखाजींना काही प्रश्न इंग्लिशमध्ये विचारण्यास सांगितले आणि त्यावरून बरीच गंमत झाली. तर घरामध्ये एक टास्कदेखील खेळण्यात येणार आहे. मागील आठवड्यात कोणामुळे घरातील तापमान वाढले यावर घरातील सदस्यांनी विणा आणि शिवानीचे नाव पुढे आणले. आणि त्यामुळे या दोघींना एक टास्क पार पाडवा लागणार आहे, ज्यामध्ये महेश सर घरच्यांना प्रश्न विचारणार आणि ज्याला जास्त वोट मिळतील त्याच्यावर थंडगार पाण्याचा वर्षाव होणार आहे. आता बघुया शिवानी आणि विणा यांपैकी कोणाला या थंडगार पाण्याचा वर्षाव सहन करावा लागेल. तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ चा WEEKEND चा डाव आणि कोण जाणार घराबाहेर आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

विणा आणि शिवानीमध्ये झालेल्या वादाचा निकाल लावण्यासाठी सिझनचा पहिला खटला घरामध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिजीत बिचुकले यांनी शिवानी सुर्वेला निर्दोष ठरवले. परंतु या सगळ्यामध्ये अभिजीत बिचुकले शिवानीच्या बाजूने असल्याचे विणाने व्यक्त केले. विणाला शिक्षा देखील ठोठावण्यात आली. काल WEEKEND चा डाव मध्ये विणाला महेश मांजरेकर यांनी ती कुठे चुकत हे सांगितले तर शिवानीला कठोर शब्दांमध्ये खडसावले. शिवानीचा राग, ती देत असलेल्या शिव्या, गेम न खेळण्यास आणि बिग बॉस यांनी दिलेली शिक्षा म्हणजेच अडगळीच्या खोलीत रहाण्यास नकार देणे, परागशी तिचे असलेले वागणे यासगळ्यावर महेश मांजरेकरांनी शिवानीला खडे बोल ऐकवले. अशा प्रकारची वागणूक इथे सहन नाही करणार, तुझ्या रागावर ताबा ठेव असे देखील तिला सांगितले. याचबरोबर घरात पार पडलेल्या टास्क बद्दल आणि इतर वादांबद्दल देखील इतर सदस्यांशी महेश मांजरेकर बोलले. आता या बोलण्याने शिवानीच्या वागण्यामध्ये आणि इतर सदस्यांदच्या वागण्यामध्ये देखील काही बदल होईल का ? हे कळेलच.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2019 5:06 pm

Web Title: bigg boss marathi 2 weekend cha daawa elimination ssj 93
Next Stories
1 Video : ‘दीपिका, कतरिनाला ओळखत नाही’ – सोनम कपूर
2 Video : चाहत्याला पायाशी बसून ठेवल्यामुळे रणबीर कपूर ट्रोल
3 Bigg Boss Marathi 2 : एकेकाळी रोजच्या जेवणासाठीही शिवानी सुर्वेला करावा लागला होता संघर्ष
Just Now!
X