News Flash

BB OTT : राकेश बापटने शमिताकडे मागितला किस; नेहा म्हणाली “ही तर सारखी…”

'बिग बॉस ओटीटी'चा ग्रँड फिनालेसाठी प्रेक्षक खुप उत्सुक आहेत.

raqesh
(Photo-Instagram/Voot)

बिग बॉस हा बहुचर्चित आणि वादग्रस्त शो आहे. बिग बॉसचे ओटीटी वर्जन सध्या चांगलेच चर्चेत असून हा शोचा फिनाले जवळ अला आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये यंदाची थीम कनेक्शनची होती. जरी शो मध्ये सर्व कनेक्शन तोंडली असली तरी एक जोडी आहे जी खरो खर प्रेमात पडली असल्याचे दिसत आहे ती म्हणजे शमिता आणि राकेश बापटची. यांची ही जोडी सध्या सतत चर्चेत आहेत.

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात राकेश आणि शमिताचा रोमॅंटिक अंदाज बरेचदा पाहायला मिळतो. शो जसा त्याच्या फिनालेकडे येत आहे तसा त्याच्यातील जवकळी वाढताना दिसत आहे. राकेश आणि शमिताचे रोमॅंटिक अंदाजातले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत  असतात. या व्हिडीओत राकेश शमिताला सतत त्याला किसदेण्यासाठी डिमांड करताना दिसत असतो असाच एका व्हायरल व्हिडीओत राकेश शमिताला किस मागत असतो मात्र नेहा भासीनच्या एका कमेंटमुळे शमिता तिला धक्का देते. हा व्हिडीओ कलर्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राकेश सोफ्यावर आडवा झाला आहे आणि शमिताला किसची मागणी  करत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot Select (@vootselect)

यावर शमिता त्याला “थँक्यु वेरी मच” म्हणते, हे पहुन जवळच उभी असलेली नेहा भासीन राकेशला सांगताना दिसते की, “तुला या मुलीसोबत कनेक्शन  बनवायचे आहे जि सतत फु..फु..करत असते.” यावर राकेश तिला हो मला हेच आवडतं असे उत्तर देताना दिसला आहे. नेहा भसीनचे हे उत्तर ऐकल्यावर शमिता तिला धक्का मारते आणि त्यानंतर ती राकेशच्या अंगावर पडते. नेहा प्रतीकला मदतीसाठी बोलवते. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण तो एका कोपऱ्यात उभा अस्लयचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते आहे. त्यांच्या मध्ये सुरू असलेल्या या मस्करीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’चा ग्रँड फिनाले १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. करण जोहरने या कार्यक्रमाच्या ‘संडे का वार’ या भागामध्ये ‘बिग बॉस ओटीटी’ च्या विजेत्याला दिल्या जाणारी ट्रॉफीचे  अनावरण केले आहे. ही ट्रॉफी पाहून स्पर्धकही आनंदी झाले. ग्रँड फिनालेला आता तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 11:25 am

Web Title: bigg boss ott raqesh demands shamita to kiss him on which neha bhasin reaction video went viral aad 97
Next Stories
1 “जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच”; भाजपा-RSS संबंधी ‘त्या’ वादावर जावेद अख्तर यांनी सोडलं मौन
2 “पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं ‘हे’ उत्तर
3 यामी गौतमीने शेअर केलेले ‘भूत पोलीस’च्या सेटवरील भयावह फोटो पाहून नेटकरी म्हणाले…
Just Now!
X