News Flash

Bigg Boss OTT- दिव्याचा गेमप्लॅन पाहून शमिता शेट्टीला फुटला घाम; राकेश म्हणाला…

'बिग बॉस ओटीटी' मध्ये नवीन ट्विस्ट आला आहे.

shamita
(Photo-Voot)

‘बिग बॉस ओटीटी’ हा सध्या बराच चर्चेत आहे. हा शो लवकरच त्याच्या महाअंतिम सोहळ्याकडे येत आहे. त्यामुळे घरातील सदस्य प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. बिग बॉस ओटीटीच्या घरात एक मोठा ट्विस्ट आला आहे,आता घरातील सदस्य कनेक्शन सोबत नाही तर आपल्या स्व-बळावर गेम खेळताना दिसतील. बिग बॉसच्या या मोठ्या निर्णयामुळे घरातील सदस्य टेंशनमध्ये आले आहेत. तसंच घरातील स्ट्रॉंग सदस्य शमिता शेट्टीला, दिव्या अगरवालची भीती वाटत असल्याचे ती राकेशला सांगताना दिसते आहे.

शोच्या सुरवातीला शमिता आणि दिव्याचे खूप चांगले संबंध होते, त्यांच्यात घट्ट मैत्री होती. मात्र त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांमुळे त्या दोघीनी एकमेकांशी अबोला धरला आहे. येणाऱ्या काळात निशांत भट्ट आणि दिव्या एकत्र आले तर? या विचाराने शमिता घाबरली असल्याचे तिने राकेश बापटला सांगितले. त्यांच्या मधील या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शमिता राकेशला सांगत आहे, “तु विचार का नाही करत? निशांत आणि दिव्या एकत्र आले तर ते आपल्यासाठी चांगले नाही. माझा दिव्यावर अजिबात विश्वास नाही..आणि तुमचा जर असेल तर तुम्ही वेडे आहात. दिव्या सुरूवातीपासून एकटी खेळत आली आहे आणि जर ती आणि निशांत एकत्र आले तर ते आपल्यासाठी चांगले नाही.”

शमिताची चिंता समजताच राकेशने तिला दिलासा देत दिव्या आणि निशांतपासून काहीच धोका नसल्याचे सांगितले. मात्र राकेशचे म्हणणे तिला पटले नसल्याने राकेश तिच्यावर रागावला आणि तिला तू डॉमिनेटिंग आहेस, ज्या पद्धतीत त्यांच्याशी बोलतेस ते मला अजिबात आवडत नाही. असे तो त्या व्हिडिओमध्ये तिला सांगताना दिसला.

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात दिव्या अगरवाल सुरूवातीपासून एकटी गेम खेळते आहे, काही दिवसांसाठी तिचे कनेक्शन जिशान खानशी झालं होतं, मात्र तो लगेच स्पर्धेतन बाहेर गेल्याने ती पुन्हा एकटीच गेम खेळत आहे. तसंच आता या नवीन ट्विस्टमुळे सर्व सदस्य सोलो गेम खेळताना दिसतील. त्यामुळे आता प्रेक्षक शोमध्ये पुढे काय होणार? या साठी आतुर झाले आहेत. पुढच्या दोन आठवड्यात ‘बिग बॉस ओटीटी’चा महाअंतिम सोहळा आहे. यानंतर ‘बिग बॉस’चा १५ वा सिझन ३ ऑक्टोबर पासून कलर्सवर सलमान खान होस्ट करताना दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 3:17 pm

Web Title: bigg boss ott shamita confess to rakesh that she is scared of divya s game plan aad 97
Next Stories
1 “मानवची भूमिका साकारण्यासाठी मी स्वत:ला…”, ‘पवित्र रिश्ता २.०’ बद्दल शाहीर शेखने केला खुलासा
2 प्रियांका चोप्राच्या ‘मॅट्रिक्स ४’ चा ट्रेलर या दिवशी होणार प्रदर्शित!
3 ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात वेडी होती अभिनेत्री मृणाल ठाकूर
Just Now!
X