News Flash

बॉलिवूडवर करोनाचं सावट, भूमी पेडणेकरला करोनाची लागण

सर्व काळजी घेऊनही करोनाची लागण

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तर दुसरीकडे बॉलिवूडवर करोनाचे ढग पसरताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये करोनाची लागण होणाऱ्या सेलिब्रिटींची यादी वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात अक्षय कुमार, गोविंदानंतर आता अभिनेत्री भूमी पेडणेकरला करोनाची लागण झाली आहे. भूमी पेडणेकरने सोशल मीडियावरून तिला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

भूमीने एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. काही सौम्य लक्षण दिसून येत आहेत पण मी ठिक आहे. मी विलगीकरणात असून डॉक्टर आणि वैद्यकिय जाणकारांनी दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करत आहे. जर तुम्ही माझ्या संपर्कात आला असाल तर तातडीने करोना चाचणी करून घ्या. ” असं म्हणत भूमीने ती संपूर्ण काळजी घेत असल्याचं सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

पुढे ती म्हणाली आहे, “वाफ घेणं, विटामिन सी, खाणं आणि आनंदी मूड असं सर्व सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. सर्व काळजी घेऊनही मला करोनाची लागण झाली. मास्क घाला. सॅनिटाइझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा आणि सामाजिक भान राखा.” अशी पोस्ट करत भूमीने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

‘राम सेतु’च्या सेटवर करोनाचा उद्रेक; अक्षय कुमारनंतर 45 जणांना करोनाची लागण

अनेक सेलिब्रिटींनी भूमीच्या या पोस्टनंतर चिता व्यक्त केली आहे. तसचं तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे. गेल्या काही दिवसात बॉलिवूडमध्ये करोनाची चिंता वाढू लागली आहे. अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण होत असल्याचं पाहायला मिळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:58 pm

Web Title: bollywood actress bhoomi pednekar tested covid positive kpw 89
Next Stories
1 अक्षय-गोविंदानंतर विकी कौशलला करोनाची लागण
2 अभिनेता,दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव करोना पॉझिटिव्ह; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
3 अनुष्काची प्रेरणा आणि विराटची खास कामगिरी…
Just Now!
X