गेल्या काही दिवसांपासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे. नुकतच बिग बींनी मुलगा अभिषेक बच्चनला त्याच्या ‘बिग बुल’ सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यावेळी देखील त्यांनी सस्पेन्स निर्माण करत चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे. बिग बी यांनी अभिषेकला शुभेच्छा देताना म्हंटलं आहे. ” आठवतंय भय्यू WHTCTW..!’ यासोबतच त्यांनी हार्टचे इमोजी दिले आहेत.
remember bhaiyu WHTCTW .. !! https://t.co/Ik1i4jLvJx
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 7, 2021
गेल्या काही दिवसांपासून बिग बी यांनी चाहत्यांसमोर मोठा सस्पेन्स निर्माण केला आहे. बिग बी यांनी अभिषेकला शुभेच्छा देताना गेल्या काही दिवसात ” WHTCTW” या अक्षरांचा अनेकदा उल्लेख केला आहे. मात्र या मागचा नेमका अर्थ काय हे चाहत्यांना समजू शकलेलं नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी याचा अर्थ सांगावा अशी चाहत्यांकडून बिग बींना विनंती केली जात आहे. बिग बी यांनी वेळेवेळी अभिषेकला “आठवतंय का WHTCTW” असं म्हंटलं आहे. त्यामुळे हे काही तरी बाप लेकामधील गुपीत असल्याचं लक्षात येतंय. मात्र हेच गुपीत जाणून घेण्यासाठी अनेक चाहते सध्या आतूर आहेत.
All wishes remember WHTCTW https://t.co/aK1MXu4zcY
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 26, 2021
अभिषेक बच्चनचा बिग बुल 8 एप्रिलला म्हणजेच आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. तर बिग बींचा चेहके या आधी 9 एप्रिलला सिनेगृहात प्रदर्शित होणार होता… मात्र करोनाच्या वाढत्या संक्रमणापुढे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.