News Flash

मेकअप खराब होऊन नये म्हणून सनी लिओनी वापरते ‘हा’ खास मास्क

सुंदर मी दिसणार! सनी लिओनीचा खास मास्क एकदा पाहाच

मेकअप खराब होऊन नये म्हणून सनी लिओनी वापरते ‘हा’ खास मास्क

करोनाचं संकट अजूनही कमी झालेलं दिसत नाही. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून लॉकडाउन असल्यामुळे अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, आता ही वस्कटलेली घडी पुन्हा पूर्वपदावर येताना दिसते. सगळ्याच क्षेत्रांसोबत कलाविश्वातील कामकाजदेखील सुरळीत होत आहे. अनेक चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्येच अभिनेत्री सनी लिओनी तिच्या आगामी प्रोजेक्टकडे वळली आहे. या सेटवरचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांमध्ये तिचा नवीन मास्क चर्चेचा विषय ठरत आहे.

करोना काळातदेखील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या फॅशनसेन्स आणि मास्कच्या नवीन ट्रेण्डमुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या कपड्यांना मॅच होणारे खास मास्क तयार करुन घेते. परंतु, या सगळ्यात सनी लिओनीचा मास्क आकर्षणाचा विषय ठरत आहे. मेकअप खराब होऊ नये याची खबरदारी म्हणून सनीने खास नवीन मास्क तयार करुन घेतल्याचं दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Staying protected between shots without destroying my make up 🙂

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


सनीने तिच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पारदर्शक मास्क लावल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या पारदर्शक मास्कमध्ये तिचं नाक, तोंड सगळं कव्हर होत असून तिने केलेला मेकअपदेखील नीट दिसत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत सनीने तिल्या कॅप्शनदेखील तसंच दिलं आहे.

मेकअप खराब न करता चित्रीकरणादरम्यान मिळालेल्या वेळात सुरक्षित, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सनी तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेत गेली होती. मात्र, आता ती परत मुंबईत परतली असून आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणाकडे वळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 9:03 am

Web Title: bollywood sunny leone mask without destroying make up ssj 93
Next Stories
1 ‘ट्रोल करणं थांबवा अन्यथा…’; नेहासोबतचा तो व्हिडीओ पाहून हिमांश कोहली संतापला
2 ‘..तर नितिश कुमार यांना भाजपाची बाहुली बनावं लागेल’; अभिनेत्याने व्यक्त केली भीती
3 शाहरुखने सांगितलं, ‘या’ कारणामुळे मी आणि अक्षय एकत्र काम नाही करु शकतं
Just Now!
X