News Flash

आमिर खान आणि राजू हिराणी विरोधात राजस्थानामध्ये तक्रार दाखल

बॉलिवूडच्या 'पीके' या चित्रपटाविरोधातील वाद अजूनही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत.

| January 2, 2015 04:03 am

बॉलिवूडच्या ‘पीके’ या चित्रपटाविरोधातील वाद अजूनही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या चित्रपटातील मुख्य कलाकार आमिर खान, दिग्दर्शक राजू हिराणी आणि ‘पीके’च्या निर्मात्यांवर राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील बजाज नगर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय दंडसंहितेच्या २९५ अ आणि १५३ अ या कलमांनुसार धार्मिक भावना दुखावणे आणि समाजात द्वेषभाव निर्माण करण्याचा ठपका या चित्रपटावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनाच्या विरोधामुळे ‘पीके’ या चित्रपटाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 4:03 am

Web Title: case lodged against pk actor aamir khan director raju hirani and producer in rajasthan
Next Stories
1 ऑस्ट्रेलियात अनुष्का-विराटचे न्यू ईयर सेलिब्रेशन
2 अबरामसोबत शाहरुखने केली नववर्षाची सुरुवात
3 ‘शमिताभ’ ते ‘बाजीराव मस्तानी’
Just Now!
X