News Flash

Video : “क्वारंटाइनमध्ये काय काय सहन करावं लागतंय बघा”

पत्नी अनुष्कापुढे विराटने पत्करली शरणागती

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून सर्वत्र जनजागृती केली जात आहे. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

Video : विल्यमसनचा कुत्राही आहे ‘सुपर-फिल्डर’; घेतला अप्रतिम झेल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीदेखील आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरी वेळ घालवत आहे. अनुष्काने दोघांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटचे केस कापताना दिसत आहे. अनुष्काने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘क्वारंटाईनमध्ये तुम्हाला काय करावे लागते बघा’, असे विराट बोलताना दिसत आहे. यावर ‘स्वयंपाकघरातल्या कात्रीने केस कापणं मला आवडतं’, असे उत्तर अनुष्का विराटला देताना दिसते. अखेर ‘माझ्या बायकोने सुंदर केस कापले आहेत’, असे म्हणl विराट शरणागती पत्करतो.

…तेव्हाच कळलं होतं भारत लॉकडाउन होणार – रवी शास्त्री

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Meanwhile, in quarantine..

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

या आधी विराट-अनुष्काने करोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. पण विराटने अद्याप करोनाग्रस्तांसाठी मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीक करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:09 pm

Web Title: coronavirus outbreak pm modi lockdown quarantine period anushka sharma gives virat kohli a haircut with kitchen scissors this is what quarantine does to you he says vjb 91
Next Stories
1 Video : विल्यमसनचा कुत्राही आहे ‘सुपर-फिल्डर’; घेतला अप्रतिम झेल
2 …तेव्हाच कळलं होतं भारत लॉकडाउन होणार – रवी शास्त्री
3 ‘तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’, मीडियावर संतापली साक्षी धोनी
Just Now!
X