29 October 2020

News Flash

Video : हिमेश रेशमियामुळे दीपिकाला मिळाला होता ‘ओम शांती ओम’?

या अल्बममध्ये दीपिकाने एक लहानशी भूमिका केली

‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून नावारुपाली आलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या दीपिकाचे आज असंख्य चाहते आहेत. ‘बाजीराव-मस्तानी’,’पद्मावत’ या चित्रपटाने दीपिकाला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र या चित्रपटामध्ये झळकण्यापूर्वी दीपिकाने बॉलिवूड गायक, संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया याच्या ‘नाम है तेरा’ या म्युझिक अल्बममध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे या अल्बममुळेच दीपिकाला ‘ओम शांती ओम’ चित्रपट मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

२००६ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘नाम है तेरा हा अल्बम त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. या अल्बममध्ये अभिनेत्री दीपिकाने एक लहानशी भूमिका केली. मात्र या अल्बममधील तिचा लूक प्रचंड व्हायरल झाला होता. इतंकच नाही तर याच अल्बममुळे तिला तिच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली.

‘नाम है तेरा’ हा अल्बम चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांनी पाहिला आणि त्यांनी ‘ओम शांती ओम’साठी दीपिकाला पहिली पसंती दिली. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामध्ये दीपिका मुख्य भूमिकेत झळकली असून हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता.

दरम्यान, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटामुळे दीपिकाची लोकप्रियता कमालीची वाढली. आजवरच्या कारकिर्दीमध्ये दीपिकाने अनेक चित्रपट केले असून तिचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरलेला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 12:16 pm

Web Title: deepika had featured in himeshs video naam hai tera ssj 93
Next Stories
1 अर्जुन रामपालने शेअर केला मुलासोबतचा पहिला फोटो
2 ‘सुपर ३०’ची सेंच्युरी!
3 ‘सेक्रेड गेम्स २’च्या कथेबद्दल सैफ अली खानने केला हा खुलासा
Just Now!
X