News Flash

दीपिका पदूकोणचं संपूर्ण कुटूंबच करोना पॉझिटिव्ह ; वडील रूग्णालयात दाखल

प्रकाश पादूकोण यांची प्रकृती स्थिर

देशभरात लॉकडाउनचे नियम कठोर करूनही करोना मात्र काही संपण्याचं चित्र दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत करोना रूग्णांच्या संख्येत घट तर दिसून येत आहे, मात्र ही संख्या करोना चाचण्यांचं प्रमाण कमी झालं असल्यानं कमी दिसून येतेय असं जाणकारांचं मत आहे. त्यात करोनाने बॉलिवूडकरांनाही सूट दिलेली नाही. बॉलिवूडची ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पदूकोणचं संपूर्ण कुटूंबच करोनाच्या जाळ्यात सापडलंय. दीपिकाच्या वडिलांना बंगलोर इथल्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

१० दिवसांपूर्वीच दीपिकाच्या आई, बहिण आणि वडिलांचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला होता. या सर्वांवर बंगलोर इथल्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर एक आठवड्यातच दीपिकाच्या आई उज्ज्वला पदूकोण आणि बहिण अनिशा पदूकोण यांची प्रकृती सुधारली आहे. परंतू दीपिकाचे वडील प्रकाश पदूकोण अजुनही करोनाशी सामना करत आहेत.

अभिनेत्री दीपिका पदूकोणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलं. “जेव्हा मी, माझं कुटूंब आणि आपण सर्वच जण ठीक होण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहीजे की आपल्याला भावनात्मक रूपातूनही ठीक होणं गरजेचं असतं.” कुटूंबावर कोसळलेल्या या करोना संकटात ती त्यांच्यापासून दूर असली तरी फोनद्वारे संपर्क करून त्यांची साथ देतेय. या पोस्टमध्ये तिनं, ‘यु आर नॉट अलोन’ हा हॅशटॅग वापरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

६५ वर्षीय प्रकाश पदूकोण हे भारताचे पूर्व बॅटमिंटनपटू आहेत. एक आठवड्यापासून ते करोनाशी सामना करत असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तसंच येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज ही देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

करोनामुळे बॉलिवूडमधील कलाकार अडचणीत
करोनामुळे बॉलिवूड क्षेत्राची अत्यंत वाईट अवस्था वाईट झाली आहे. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक कलाकारांना करोना झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री करिना कपूर हिचे वडील रणधीर कपूरना सुद्धा करोना झाला. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय ‘पटियाला बेब्स’ फेम अनिरूद्ध दवे, ‘बिग बॉस १४’ फेम रूबिना दिलैक आणि काही दिवसांपूर्वी वडिलांना गमावलेल्या हिना खान सुद्धा करोनाशी झुंज देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 7:32 pm

Web Title: deepika padukone bollywood actress family father prakash padukone corona positive prp 93
Next Stories
1 ‘इंडियाज बेस्ट डान्सर -2’ साठी डिजिटल ऑडिशन्स सुरू
2 ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अनिता दातेची एण्ट्री
3 चित्रपटसृष्टीतील ३० हजार कामगारांना करोनाचं लसीकरण, YRF ने घेतली जबाबदारी
Just Now!
X