News Flash

दीपिकाने मानधन वाढवले, तीन दिवसांच्या शूटसाठी ८ कोटींची मागणी!

करार निश्चित झाल्यास दीपिका सर्वाधिक मानधन घेणाऱया अभिनेत्रींच्या यादीत अव्वल ठरेल

दीपिकाचा तीन दिवसांसाठीचा ८ कोटींचा करार पाहता तिचे एका दिवसाचे मानधन २ कोटी ६६ लाखांच्या घरात जाईल.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जाहिरातीसाठीच्या मानधनात वाढ केली असून, एका ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी तिने तब्बल ८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. केवळ तीन दिवसांच्या शूटसाठी तिने ही अट घातली आहे. दीपिकाचा हा करार यशस्वी झाला तर ती जाहिरातीसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱया सलमान, शाहरुख, आमीर आणि रणबीर यांच्या रांगेत जाऊन बसेल. याशिवाय, क्रीडा जगतात महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्याही मानधनाशी दीपिकाची बरोबरी होईल.

समोर आलेल्या माहितीनुसार दीपिकाचा हा करार एका एअरलाईन्स कंपनीसोबत होणार असून, तिचा हा करार निश्चित झाल्यास दीपिका सर्वाधिक मानधन घेणाऱया अभिनेत्रींच्या यादीत अव्वल ठरेल. सध्या प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ एका दिवसाच्या शूटसाठी एक कोटीच्या जवळपास मानधन घेतात. दीपिकाचा तीन दिवसांसाठीचा ८ कोटींचा करार पाहता तिचे एका दिवसाचे मानधन २ कोटी ६६ लाखांच्या घरात जाईल.

दरम्यान, दीपिका आणि एअरलाईन्स कंपनी यांच्यातील बातचीत शेवटच्या टप्प्यात आहे. पण दीपिकाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे दीपिकाला तीन दिवसांच्या शूटसाठी एवढी मोठी रक्कम दिली जाणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2016 5:55 pm

Web Title: deepika padukone charges rs 8 cr for a three day shoot of an airlines endorsement
टॅग : Deepika Padukone
Next Stories
1 ‘हाफ गर्लफ्रेण्ड’मध्ये अर्जुन कपूर बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत
2 ‘उडता पंजाब’वरून बॉलिवूड एकवटले, निहलानींच्या हकालपट्टीची मागणी
3 ‘हृतिक-कंगनाच्या वादात माझी भूमिका न्यायाधीशाची’
Just Now!
X