News Flash

डॉ. अजित कुमार देव आणि डिंपलची लगीनघाई

'देवमाणूस' मालिकेमध्ये रंजक वळण

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. हि मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील सरू आज्जी, डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. आता मालिकेत डिंपल आणि अजितच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.

‘देवमाणूस’ ही मालिका आता एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे. अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागते. इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे.

आता जशी या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवीसिंगला अटक कधी होणार? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागलेय. तसंच डॉक्टरसोबत डिंपललासुद्धा पोलीस ताब्यात घेणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आगामी भागात मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 1:52 pm

Web Title: devmanus serial update ajitkumar and dimple marriage avb 95
Next Stories
1 पलक तिवारीने डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट; सोशल मीडियावर चर्चा
2 पुणे : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला
3 आशुतोष यांनी पहिल्याच भेटीत केला कौतुकाचा वर्षाव; रेणुका शहाणेंची खास लव्हस्टोरी