जगभरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कुठलीही अधिकृत लस तयार झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या चाहत्यांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी हा सल्ला मुग्यांना देखील दिला. मुंग्यांनी धर्मेंद्र यांच्या फार्स हाऊसवर एक सुंदर वारुळ तयार केलं आहे. या वारुळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

धर्मेद्र यांच्या फार्स हाऊसवर मुंग्यांनी एक सुंदर वारुळ तयार केलं आहे. या वारुळाचा फोटो ट्विट करुन त्यांनी याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. “करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी स्वत:च्या घरातच थांबा. स्वत:ची काळजी घ्या.” अशा आशयाची कॉमेंट त्यांनी या फोटोवर लिहिली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांनी केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “ही बाई आता काहीही बरळतेय”; अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा

करोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला ११ लाखांचा टप्पा

भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे. ३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.