बॉलिवूडची स्टार प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर २४ ऑक्टोबर रोजी लग्न बंधनात अडकणार असे म्हटले जात आहे. नेहा गायक रोहनप्रीत सिंहशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. नेहा किंवा रोहनप्रीतने या सर्व चर्चांवर अद्याप वक्तव्य केलेले नाही. पण आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून त्यांचा रोका झाल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर चर्चा सुरु असलेल्या फोटोंमध्ये नेहा आणि रोहनप्रीत एका सोफ्यावर बसले आहेत. दरम्यान नेहाच्या एका हातामध्ये गिफ्ट्स असून दुसरा हात रोहनप्रीतने पकडला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा फोटोपाहून चाहत्यांनी नेहाचा रोका झाल्याचे म्हटले आहे. पण हा फोटो जुना आहे की आताचा याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच नेहा किंवा रोहनप्रीतने याबाबत माहिती दिलेली नाही.

आणखी वाचा : नेहा कक्करच्या लग्नावर एक्स बॉयफ्रेंड हिमांशू कोहलीची प्रतिक्रिया, म्हणाला…

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांना नेहा लग्न सोहळाचे आमंत्रण देणार आहे. ती २४ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले जाते. रोहनप्रीत आणि नेहाने नुकताच एका म्यूजिक अल्बममध्ये एकत्र काम केले होते.

कोण आहे रोहनप्रीत?
रोहनप्रीत एक गायक आहे. त्याने रिअॅलिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये त्याने शेहनाज गिलला लग्नासाठी विचारले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आणि नेहाने एका अल्बममध्ये एकत्र काम केले आहे.