05 March 2021

News Flash

सलमानने बिग बॉस १४साठी वाढवली फी, घेणार इतके कोटी?

ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणाार असल्याचे म्हटले जात आहे

पण याचा सलमानच्या करिअरवर परिणाम झाला नाही. आज सलमानचे चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करताना दिसतात.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बॉलिवूडचा भाईजान सलमान या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतो. त्यामुळे शोची लोकप्रियता आणखी वाढत असल्याचे पाहायला मिळते. बिग बॉसचे १३वे पर्व चर्चेत होते. आता बिग बॉसचे १४वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. या १४व्या पर्वाचे देखील सलमान खान सूत्रसंचालन करणार असून त्याने त्याच्या मानधनामध्ये वाढ केल्याचे म्हटले जात आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यात बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणाार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच सलमान एका एपिसोडसाठी १६ कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. बिग बॉस १३च्या एका एपिसोडसाठी सलमानने १२ ते १४ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जात होते. आता सलमानने त्याच्या मानधनामध्ये वाढ केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरवर्षी बिग बॉसच्या घराची वेगळी थिम असते. यंदा कोणती थिम असणार हे पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. तसेच सध्या देशात करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बिग बॉसच्या घरात काय नवीन पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. बिग बॉस १४मध्ये अभिनेत्री जॅस्मीन भसीन, अलीशा पवार,आरुषि दत्ता, आकांक्षा पुरी, आंचल खुराना, सहिल खान आणि आमिर सिद्धीकी हे कलाकार सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बिग बॉस पर्व १३चा सिद्धार्थ शुक्ला विजेता ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 9:48 am

Web Title: did salman khan increase fees for bigg boss 14 avb 95
Next Stories
1 ‘…आता परीक्षा देवाची’; प्रवीण तरडेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा
2 ट्रायच्या अ‍ॅपमुळे वाहिन्यांची निवड सोपी
3 “..अशा लोकांचे चित्रपट पाहणं बंद करणार”; अभिनेत्रीने घेतला निर्णय
Just Now!
X