News Flash

न्यूड सीन देण्याआधी राधिका आणि आदिल मध्ये झाले होते ‘हे’ बोलणे

आता न्यूड सीन देताना राधिकाला काही वाटणार नाही असं देखील ती म्हणाली आहे. राधिका आणि आदिलने 'पार्च्ड' चित्रपटात न्यूड सीन दिला होता.

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे तिच्या अभिनयामुळे आणि चित्रपटांमध्ये दिलेल्या न्यूड सीनमुळे नेहमीच चर्चेत असते. राधिकाने लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ चित्रपटात अभिनेता आदिल हुसेनसोबत न्यूड सीन दिला होता. या सीनमुळे राधिका चर्चेत होती. यावर राधिका आणि आदिलने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

हे सर्व करणे इतकं सोपं नाही असं म्हणतं राधिकाने या गोष्टीचा खुलासा केला आहे. “हे अजिबात सोपं नव्हतं कारण त्यावेळी मी माझ्या बॉडी इमेजला घेऊन चिंतेत होती. अशा परिस्थितीत न्यूड सीन देणे अत्यंत भयानक होते. आता मला माझ्या बॉडी शेप आणि साइजचा अभिमान आहे आणि मी आता कुठेही न्यूड सीन देऊ शकते,” असे राधिका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

तर, राधिका सोबत हा सीन आदिल हुसेनने दिला होता. त्याने ‘ईटाइमस्ला’ मुलाखत दिली होती. त्यावेळी तो म्हणाला, “राधिका एक उत्तम अभिनेत्री आहे. राधिकाने स्वत: ला कलेसाठी समर्पित केले आहे आणि लोकांना हे समजले पाहिजे. कला माझ्यासाठी आणि तिच्यासारख्या लोकांसाठी महत्त्वाची आहे, लोक काय म्हणतील हे महत्त्वाचं नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Adil Hussain (@_adilhussain)

पुढे आदिलने त्यांच्या पत्नीची अशा सीनवर कशी प्रतिक्रिया असते ते सांगितले आहे. आदिलला, त्याच्या पत्नीचा अशा सीनवर आक्षेप नाही का? असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, “नक्कीच नाही, परंतु ती पहिली व्यक्ती होती, तिला मी या सीन बद्दल सांगितलं होतं. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, मला आशा आहे की तू हा सीन चांगल्या प्रकारे दिला अशील. माझी पत्नी माझ्या कामाचा आदर करते आणि तिला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही एकमेकांना थिएटरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ओळखतो आणि तिला माहित आहे की मी एक अभिनेता आहे.”

आणखी वाचा : “तिने माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले…”, शिवम पाटीलने अभिनेत्रीवर केला आरोप

या सीनचे चित्रीकरण करण्याआधी राधिका आणि आदिलमध्ये काय बोलणे झाले होते? याबाबत आदिल म्हणाला, “मी राधिकाला विचारले की तुझ्या प्रियकराची यावर काय प्रतिक्रिया असेल? तर त्याला उत्तर देत राधिका म्हणाली, तिचे लग्न झाले आहे. यानंतर राधिकाने माझ्या पत्नीबद्दल विचारले आणि मी म्हणालो की तिला काही हरकत नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 1:54 pm

Web Title: do you know what radhika apte and adil hussain discussed before their nude scene in parched dcp 98
Next Stories
1 समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे? काय आहे समरचं खरं रुप
2 सकारात्मक ऊर्जेसाठी योग उत्तम – अमृता खानविलकर
3 प्रेमात धोका,पैशासाठी कुटुंबाने केला वापर; दुःखाने भरलेलं सदाबहार अभिनेत्री नर्गिसचं आयुष्य
Just Now!
X