आपण बऱ्याच वेळा अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहतो. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. पण हेच कलाकार इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी किती पैसे घेतात हे तुम्हाला माहित आहे का? नुकताच इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी कलाकार किती पैसे घेतात ही यादी जाहिर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समोवेश आहे.
मिरर ऑनलाइनने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच या यादीमध्ये ड्वेन जॉन्सनने पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. हॉपर एचक्यू डॉटकॉमने २०२०मधील इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी सर्वाधिक पैसे घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहिर केली आहे.
या यादीमध्ये ड्वेन जॉन्सनने पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तो इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी जवळपास ७.४ कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले आहे. जॉन्सनचे इन्स्टाग्रामवर ‘द रॉक’ या नावाने अकाऊंट आहे. त्याचे जवळपास १८८ मिलियन फॉलोअर्स आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, अथिया शेट्टी, राजकुमार राव, सिद्धार्थ मल्होत्रा हे सर्व कलाकार त्याला फॉलो करत आहेत. तर या यादीमध्ये Kylie makes दुसऱ्या क्रमांकावर आहे. ती एका पोस्टसाठी ७.४ कोटी रुपये घेते.
हॉपर एचक्यू डॉटकॉमने जाहिर केलेल्या यादीमध्ये प्रियांका २८व्या क्रमांकावर आहे. प्रियांका एका पोस्टसाठी जवळपास २ कोटी रुपये घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रियांकाचे इन्स्टाग्रावर ५४.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच या यादीमध्ये विराट कोहलीचा देखील समावेश आहे. तो २६व्या क्रमांकावर आहे. तो एका पोस्टसाठी २ कोटी रुपये घेत असल्याचे म्हटले आहे.