News Flash

ऑस्ट्रेलियाच्या आलिशान रिसॉर्टवर एवलीनचं हनीमून, एक रात्र राहण्यासाठी मोजावे लागतात इतके रुपये

१५ मे रोजी एवलीनने बॉयफ्रेन्ड तुषान भिंडीशी गुपचूप लग्न केलं.

(Photo Credit : Evelyn Sharma Instagram)

‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात लाराची भूमिका साकारणारी एवलीन शर्माने काही दिवसांपूर्वी लग्न केले. एवलीनने १५ मे रोजी ऑस्ट्रेलियामध्ये बॉयफ्रेन्ड तुषान भिंडीशी लग्न केले. तर आता दोघे ही त्यांच्या हनीमूनचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. एवलीनने तिच्या हनीमूनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

एवलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केला आहेत. हे दोघे ज्या रिसॉर्टवर आहेत ते रिसॉर्ट हॅमिलटन आयलॅन्डवर आहे. एवलीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ते बीचवर सुर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत “कायम तुझ्यासोबतच हनीमून”, असे कॅप्शन एवलीनने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

आणखी वाचा : ‘अमृताला कानशिलात लगावली मला त्याच वाईट वाटतं नाही’, इशा देओलने केला खुलासा

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

एवलीन आणि तुषान ऑस्ट्रेलियामध्ये एका आलिशान रिसॉर्टमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत. या रिसॉर्टचं नावं ‘Qualia’ आहे. या आलिशान रिसॉर्टमध्ये अनेक फॅसिलिटी देण्यात आल्या आहेत. यात फ्री वाय-फाय, फ्लॅटस्क्रिन टिव्ही, मिनिबार, सी व्ह्यु सोबत डेक आहे. प्रत्येक बेडरुमला स्वतंत्र असा एक स्विमिंग पूल. एवढंच नाही तर या रिसॉर्टवर बीच हाऊस देखील आहेत. या सोबत स्पा, फिटनेस सेंटर उपलब्ध आहे. या रिसॉर्टमध्ये एक रात्री राहण्यासाठी ८१ हजार ते ८२ हजार रुपये मोजावे लागतात.

आणखी वाचा : Video : दोन महिन्यानंतर जुही घरी परतल्यानंतर मुलीने दिली अशी प्रतिक्रिया

एवलीन आणि तुषानचा ऑक्टोबर २०१९ मध्ये साखरपूडा झाला. या दोघांची पहिली भेट ही २०१८ मध्ये ब्लाइंड डेटवर झाली होती. २०१९ मध्ये सिडनी हार्बर ब्रिज जवळ तुषानने एवलीनला प्रपोज केले आणि त्यांच्या साखरपुडा झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 4:07 pm

Web Title: evelyn sharma tushaan bhindi are honeymoon at this luxury resort in australia dcp 98
Next Stories
1 दाक्षिणात्य अभिनेत्रींचा आलियाने मोडला रेकॉर्ड? ‘RRR’साठी घेतले ‘इतके’ मानधन
2 “कोला शोला सब अपनी जगह”; रोनाल्डोच्या अनेक वर्ष आधीच करीना कपूर Coca-Cola बद्दल म्हणाली होती…
3 ‘कोणी तरी मला स्पर्श करत असल्याचा भास झाला’, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव
Just Now!
X