22 September 2020

News Flash

रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा एकमेकांना टाळताहेत

काही महिन्यांपूर्वीचे प्रेमीयुगूल रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' या आगामी चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहेत. असे असले तरी, चित्रीकरणाच्या ठिकाणी...

| June 18, 2014 05:35 am

काही महिन्यांपूर्वीचे प्रेमीयुगूल रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा झोया अख्तरच्या ‘दिल धडकने दो’ या आगामी चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहेत. असे असले तरी, चित्रीकरणाच्या ठिकाणी चित्रीकरणाव्यतिरिक्त इतर वेळी ते एकमेकांपासून दूर राहताना नजरेस पडत आहेत. याचे कारण रणवीरची सध्याची गर्लफ्रेण्ड दीपिका पदुकोण तर नसेल? या दोघांबरोबर चित्रपटातील अन्य कलाकार प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर आणि चित्रपटाशीसंबंधीत अन्य काहीजण स्पेनमध्ये चित्रीकरणात व्यस्त आहेत. दीपिकासुद्धा मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर स्पेनमध्ये सुटीचा आनंद घेते आहे.

एकमेकांबरोबरील संबंधात वितुष्ट आल्यानंतर रणवीर आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. चित्रीकरणास्थळी काढण्यात आलेल्या छायाचित्रांवरून रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा एकमेकांना टाळत असल्याचे निदर्शनास येते. चित्रपटात रणवीरच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या प्रियांका चोप्राने अलिकडेच टि्वटरवर पोस्ट केलेल्या छायाचित्रात झोया, फरहान अख्तर, अनुष्का शर्मा आणि अन्य काहीजण दिसत असताना, फक्त रणवीर सिंग नजरेस पडत नाही. या आधी काढण्यात आलेल्या छायाचित्रात रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा आणि झोया अख्तर आणि रितेश सिधवानी दिसत असताना अनुष्का शर्मा या छायाचित्रात दिसत नाही. स्वत:च्या निर्मितीसंस्थेद्वारे तयार करण्यात येत असलेल्या ‘एनएच १०’ चित्रपटाचे जोधपूरमधील चित्रीकरण संपवून अनुष्का मे महिन्याच्या अखेरीस ‘दिल धडकने दो’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी रुजू झाली. इथे आल्यापासून ती रणवीरशी अंतर ठेवून वागत असल्याचे समजले. सध्या रणवीर सिंगचे नाव राम-लीलामधील त्याची सहअभिनेत्री दीपिका पदुकोणशी जोडले जात आहे, जिच्याबरोबर काही दिवसांपूर्वी तो एका क्रुझ ट्रिपवरदेखील जाऊन आला. तर, अनुष्का शर्माच्या आयुष्यात क्रिकेटपटू विराट कोहलीने प्रवेश केला आहे.

‘दिल धडकने दो’ चित्रपटात रणविर सिंग, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, अनिल कपूर आणि शेफाली शहा इत्यादींच्या भूमिका आहेत. योगायोगाने म्हणा किंवा… क्रुझ ट्रिपवर गेलेल्या पंजाबी कुटुंबियांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरत राहते. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तच्या ‘एक्सेल एन्टरटेन्मेंट’द्वारे निर्माण करण्यात येत असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. (सौजन्य – पीटीआय)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2014 5:35 am

Web Title: ex lovers ranveer singh anushka sharma avoiding each other is deepika the reason
Next Stories
1 १२ सप्टेंबर रोजी ‘क्रिचर 3D’ प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘उंगली’ २१ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात
3 हमशकल्स : बिपाशा बसूने सोडले मौन
Just Now!
X