News Flash

TE3N मधील अमिताभ, नवाजुद्दीन आणि विद्या बालनचा फर्स्ट लूक

TE3N चा फर्स्ट लूक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

First look , TE3N ,see pics , Amitabh Bachchan , Nawazuddin Siddiqui , Vidya Balan , Bollywood, Entertainment news, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
TE3N First look : रिभू दासगुप्ता यांचे दिग्दर्शन असणारा हा चित्रपट सुरूवातीला २० मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, याच्या प्रदर्शनाची तारीख १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन , नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन या तिघांचा आगामी TE3N याच चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या तिघांचे प्रथमदर्शनी पाहताना TE3N हा चित्रपट रंजक असेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. रिभू दासगुप्ता यांचे दिग्दर्शन असणारा हा चित्रपट सुरूवातीला २० मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, याच्या प्रदर्शनाची तारीख १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, फर्स्टलूकमधील पोस्टर्सवर अमिताभ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी दुचाकी चालवताना दिसत आहेत.
nawazuddin-siddiqui1
यामधील नवाजुद्दीनचा लूक पाहता त्याच्या TE3N भूमिकेचा बाज आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा वेगळा असेल असे दिसते. काही दिवसांपूर्वी हे दोघेजण पश्चिम बंगालमध्ये चित्रीकरण सुरु असताना येथील रस्त्यांवर स्कूटरवरून फिरताना दिसले होते. याशिवाय, अन्य एका पोस्टरवर अमिताभ आणि विद्या बालन एका सरकारी कार्यालयात बसल्याचे दिसत आहे. एकुणच TE3N चा फर्स्ट लूक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.
amitabhbachchan-te3n

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 12:18 pm

Web Title: first look of amitabh bachchan nawazuddin siddiqui vidya balan te3n see pics
Next Stories
1 हेमामालिनी यांनी दीपिकाला दिल्या साखरपुड्याच्या शुभेच्छा
2 माझ्या मनात मलायकाबद्दल ‘त्या’ भावना आहेत – करण जोहर
3 ते’ छायाचित्र फोटोशॉप केलेले; सुझान ह्रतिकच्या मदतीला!
Just Now!
X