मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणा-या झी गौरव पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर करण्यात आली. मराठी चित्रपटांमध्ये गेल्यावर्षी आपल्या कामगिरीने वेगळा ठसा उमटविणा-या आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यातही प्रामुख्याने चुरस रंगणार आहे ती ‘डबल सीट’ , ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मितवा’ आणि ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ या चित्रपटांमध्ये. ‘डबल सीट’ चित्रपटाने २०, ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाने १६, ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ चित्रपटाने एकूण १५ नामांकने मिळवत या स्पर्धेत रंगत आणली आहे. यासोबतच ‘मितवा’ने १५ आणि ‘संदूक’ चित्रपटाने १४ विभागात नामांकने मिळवत ही चुरस अजूनच वाढवली आहे. नुकत्याच एका शानदार सोहळ्यात मुंबईत या नामांकनाची घोषणा करण्यात आली. येत्या ११ मार्चला चित्रगौरव तर २२ मार्चला नाट्यगौरवचा शानदार पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

झी चित्रगौरव पुरस्कार २०१६ नामांकने
उत्कृष्ट चित्रपट
नटसम्राट असा नट होणे नाही – फिनक्राफ्ट मिडिया एन्टरटेनमेंट प्रा. लि.
संदूक – ऑरेंजेन एन्टरटेनमेंट प्रा. लि.
कट्यार काळजात घुसली – झी स्टुडिओज, गणेश मार्केटिंग अॅण्ड फिल्म्स
डबल सीट – ह्युज प्रॉडक्शन्स, प्रतिसाद प्रॉडक्शन्स
मितवा – मीनाक्षी सागर प्रॉडक्शन्स

उत्कृष्ट अभिनेत्री
मुक्ता बर्वे – डबल सीट
सोनाली कुलकर्णी – मितवा
मेधा मांजरेकर – नटसम्राट असा नट होणे नाही
पूजा सावंत – दगडी चाळ
प्रिया बापट – टाइमपास २

उत्कृष्ट अभिनेता
नाना पाटेकर – नटसम्राट असा नट होणे नाही
सुमीत राघवन – संदूक
अंकुश चौधरी – डबल सीट
किशोर कदम – परतु
स्वप्नील जोशी – मितवा

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
अमृता खानविलकर – कट्यार काळजात घुसली
वंदना गुप्ते – डबल सीट
भार्गवी चिरमुले – संदूक
मृण्मयी देशपांडे – नटसम्राट असा नट होणे नाही
प्रार्थना बेहरे – मितवा

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सुबोध भावे – कट्यार काळजात घुसली
विद्याधर जोशी – डबल सीट
मोहन जोशी – देऊळ बंद
विक्रम गोखले – नटसम्राट असा नट होणे नाही
मकरंद देशपांडे – दगडी चाळ

उत्कृष्ट दिग्दर्शक
महेश मांजरेकर – नटसम्राट असा नट होणे नाही
सुबोध भावे – कट्यार काळजात घुसली
समीर विद्वांस – डबल सीट
अतुल काळे – संदूक
स्वप्ना वाघमारे जोशी – मितवा

उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन
सुजीतकुमार – “सत्यम शिवम” – मितवा
उमेश जाधव – “वा वू वा वू” – टाइमपास २
उमेश जाधव – “धनक धनक” – उर्फी

उत्कृष्ट छायाचित्रण
अर्जुन सोरटे – डबल सीट
अजित रेड्डी – संदूक
अजित रेड्डी – नटसम्राट असा नट होणे नाही
सुधीर पलसाने – कट्यार काळजात घुसली
प्रसाद भेंडे – मितवा

उत्कृष्ट गीतकार
मंगेश कांगणे – “सूर निरागस हो” – कट्यार काळजात घुसली
स्पृहा जोशी – “किती सांगायचंय मला” – डबल सीट
क्षितीज पटवर्धन – “धागा धागा” – दगडी चाळ
अश्विनी शेंडे – “सावर रे” – मितवा
क्षितीज पटवर्धन – “रित्या सा-या दिशा” – डबल सीट

उत्कृष्ट पार्श्वगायिका
आनंदी जोशी – “किती सांगायचंय मला” – डबल सीट
विभावरी आपटे – “नात्यास नाव अपुल्या” – नटसम्राट असा नट होणे नाही
जान्हवी प्रभू अरोरा – “सावर रे मना” – मितवा
श्रेया घोषाल – “अधीर मन झाले” – नीळकंठ मास्तर
आनंदी जोशी – “धागा धागा” – दगडी चाळ

उत्कृष्ट पार्श्वगायक
शंकर महादेवन – “सूर निरागस हो” – कट्यार काळजात घुसली
हृषिकेश रानडे – “रित्या सा-या दिशा” – डबल सीट
हर्षवर्धन वावरे – “धागा धागा” – दगडी चाळ
जसराज जोशी – “किती सांगायचंय मला” – डबल सीट
स्वप्नील बांदोडकर – “सावर रे मना” – मितवा

उत्कृष्ट संगीत
शंकर एहसान लॉय – कट्यार काळजात घुसली
शंकर एहसान लॉय , अमितराज, पंकज पडघन, नीलेश मोहरीर – मितवा
चिनार – महेश – टाइमपास
हृषिकेश –सौरभ – जसराज – डबल सीट
अजय – अतुल – नीळकंठ मास्तर

उत्कृ्ष्ट कथा
स्वप्ना वाघमारे जोशी – मितवा
नितीन अडसूळ – परतु
क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस – डबल सीट
प्रवीण तरडे – देऊळ बंद
अतुल काळे – संदूक
झी नाट्यगौरव पुरस्कार २०१६ व्यावसायिक नाटक – नामांकने

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
अदिती सारंगधर – ग्रेसफूल
कादंबरी कदम – शेवग्याच्या शेंगा
ऋजुता देशमुख – सेल्फी
शर्वरी लोहोकरे – हा शेखर खोसला कोण आहे ?
समिधा गुरू – तळ्यात मळ्यात

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
संदेश उपश्याम – स्पिरीट
सुनील जाधव – जाऊ द्या ना भाई
सुशील इनामदार – हा शेखर खोसला कोण आहे ?
रोहित हळदीकर – दोन स्पेशल
जयंत सावरकर – के दिल अभी भरा नही

उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री
निर्मिती सावंत – श्री बाई समर्थ
आतिषा नाईक – शेवग्याच्या शेंगा
पूजा अजिंक्य – टॉस
पूर्वा कौशिक – जाऊ द्या ना भाई
ऐश्वर्या पाटील – जाई द्या ना भाई

उत्कृष्ट विनोदी अभिनेता
अभिजीत पवार – ऑल दि बेस्ट २
समीर चौगुले – श्री बाई समर्थ
संदीप रेडकर – जाऊ द्या ना भाई
मयुरेश पेम – ऑल दि बेस्ट २
मुकेश जाधव – जरा हवा येऊ द्या

उत्कृष्ट अभिनेत्री
मधुरा वेलणकर साटम – हा शेखर खोसला कोण आहे ?
रीमा – के दिल अभी भरा नही
गिरीजा ओक गोडबोले – दोन स्पेशल
अमृता सुभाष – परफेक्ट मिसमॅच
स्वाती चिटणीस – शेवग्याच्या शेंगा

उत्कृष्ट अभिनेता
किरण माने – परफेक्ट मिसमॅच
जितेंद्र जोशी – दोन स्पेशल
संजय मोने – शेवग्याच्या शेंगा
गिरीश ओक – कहानीमे ट्विस्ट
तुषार दळवी – हा शेखर खोसला कोण आहे ?

उत्कृष्ट लेखन
डॉ. विवेक बेळे – अ फेअर डील
हिमांशु स्मार्त – परफेक्ट मिसमॅच
शेखर ताम्हाणे – तिन्हीसांज
गजेंद्र अहिरे – शेवग्याच्या शेंगा
शेखर ढवळीकर – के दिल अभी भरा नही

उत्कृष्ट दिग्दर्शन
विजय केंकरे – हा शेखर खोसला कोण आहे ?
क्षितिज पटवर्धन – दोन स्पेशल
मंगेश कदम – परफेक्ट मिसमॅच
गजेंद्र अहिरे – शेवग्याच्या शेंगा
संपदा जोगळेकर कुळकर्णी – तिन्हीसांज

उत्कृष्ट विनोदी नाटक
श्री बाई समर्थ – अष्टविनायक
जाऊ द्या ना भाई – सुप्रिया प्रॉडक्शन्स
ऑल दि बेस्ट २ – अनामय

उत्कृष्ट नाटक
दोन स्पेशल – अथर्व थिएटर्स, मिश्री थिएटर्स
अ फेअर डील – श्री सिद्धिविनायक , महाराष्ट्र रंगभूमी
तिन्हीसांज – त्रिकूट
परफेक्ट मिसमॅच – सोनल प्रॉडक्शन्स
शेवग्याच्या शेंगा – श्री चिंतामणी

झी नाट्यगौरव पुरस्कार 2016 प्रायोगिक नाटक – नामांकने
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मयुरी, मोहिनी, नुपूर, श्रद्धा, दीप्ती – गढीवरच्या पोरी
अमृता मोरे – कोबीची भाजी
कल्याणी पाठारे – खिडकी
पूजा रायबागी – क्रमशः पुढे चालू
श्रुती कुलकर्णी – चॉकलेटचा बंगला

उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
पुर्णानंद – मन की बात
आशिष भिडे – मोरू द सोल्युशन
यतिन माझिरे – एकूट समूह
प्रसाद सावंत – खिडकी
भावेश टिटवाळकर – दोन बाकी एकाकी

उत्कृष्ट अभिनेत्री
तन्वी कुलकर्णी – चॉकलेटचा बंगला
ईला भाटे – पै पैशाची गोष्ट
भाग्यश्री निंबाळकर – एकूट समूह
मानसी कुलकर्णी – MH 02 DL 5262
केतकी विलास – मन की बात

उत्कृष्ट अभिनेता
चंद्रशेखर गोखले – खिडकी
अभिजीत केळकर – एकूट समूह
अजिंक्य गोखले – चॉकलेटचा बंगला
प्रभाकर पवार – मकबूल
राजन जोशी – साखर खाल्लेला माणूस

उत्कृष्ट लेखक
प्रतिक कोल्हे – मन की बात
दत्ता पाटील – गढीवरीच्या पोरी
राजीव जोशी – मोरू द सोल्युशन
डॉ. समीर मोने – उदकशांत
विद्यासागर अध्यापक – साखर खाल्लेला माणूस

उत्कृष्ट दिग्दर्शक
प्रतिक कोल्हे – मन की बात
अभिजीत झुंजारराव – ID अर्थात I चं Deconstruction
यतिन माझिरे – एकूट समूह
विश्वास सोहोनी – MH 02 DL 5262
डॉ. अनिल बांदिवडेकर – मोरू द सोल्युशन

उत्कृष्ट नाटक
मन की बात – लॉजिकल थिंकर्स
MH 02 DL 5262 – आविष्कार, मुंबई
एकूट समूह – संक्रमण, पुणे<br />चॉकलेटचा बंगला – नाट्यमंडळ
मोरू द सोल्युशन – रिलायन्स एनर्जी लिमिटेड, महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ, क.ख.ग. नाट्यसंस्था