22 September 2020

News Flash

Video : खरा मी, खोटा मी….गश्मीर महाजनीच्या लॉकडाऊनचे २८ दिवस

फक्त सोशल मीडियापुरता खटाटोप करणार अनेकजण असतात.

अभिनेता गश्मीर महाजनी

क्वारंटाइनमध्ये काय करायचं हे ज्याने त्याने आपापल्या आवडीनुसार ठरवलंच आहे. म्हणूनच काही सेलिब्रिटी चित्र काढताना, काही व्यायाम किंवा योगा करताना किंवा काही स्वयंपाक करताना दिसतात. हे सेलिब्रिटी क्वारंटाइन वेळेत काय करत आहेत, याचे सर्व अपडेट्स सोशल मीडियाद्वारे देत आहेत. पण यात असेही काही जण आहेत, ज्यांनी फक्त सोशल मीडियापुरता हा खटाटोप केला आहे. अभिनेत गश्मीर महाजनी याने फेसबुकवर हा गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत गश्मीर लॉकडाउनच्या गेल्या २८ दिवसांत काय काय केलंय हे दाखवतोय. पण यात एक ट्विस्ट आहे. त्याने अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या त्याने खऱ्या आयुष्यात केल्याच नाहीत. ‘खरा मी, खोटा मी’, असं कॅप्शन देत फेसबुकवर व्हिडीओ टाकताना काय करतो आणि खऱ्या आयुष्यात काय वेगळं असतं हे गश्मीरने या व्हिडीओद्वारे दाखवलं आहे. या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरून लाइक्स मिळत आहेत.

क्वारंटाइनमध्ये माधुरीची लेकासोबत डान्स जुगलबंदी; शेवटपर्यंत पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर वाहवा मिळवण्यासाठी अनेकजण विविध शक्कल लढवताना दिसतात. त्यांच्यासाठी गश्मीरने हा गमतीशीर व्हिडीओ शूट करून पोस्ट केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 5:05 pm

Web Title: gashmir mahajani lockdown 28 days real and reel watch video ssv 92
Next Stories
1 कंगनाची बहिण अडचणीत; आधी झाले अकाउंट सस्पेंड अन् आता पोलीस तक्रार
2 बबिता फोगटला केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी – कंगना रणौत
3 रवी जाधवच्या मुलाला मिळालं सरप्राइज; जीवनदान देणाऱ्या व्यक्तीशी अशी झाली भेट
Just Now!
X