05 March 2021

News Flash

हर्षवर्धन कपूरच्या नखऱ्यांनी सगळेच त्रस्त

अनिल कपूरच्या मुलानं 'मिर्जिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरनं ‘मिर्जिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हर्षवर्धनचा हा चित्रपटत रुपेरी पडद्यावर चांगलाच आदळला. सोनम कपूर एवढं वलय बॉलिवूडमध्ये हर्षवर्धनला लाभलं नाही पण, त्याच्या फटकळ स्वभावामुळे मात्र सध्या तो चर्चेत आला आहे. एका कार्यक्रमात काही छायाचित्रकारांनी हर्षवर्धनला हर्ष या नावानं हाक मारली त्यामुळे तो काहीसा चिडला होता. हर्षवर्धनऐवजी अनेकांनी हर्ष हाक मारली  यावर त्यानं आक्षेप घेतला. तसेच हर्ष या नावानं हाक मारण्याऐवजी हर्षवर्धन नावानं हाक मारवी अशी सूचना त्यानं जमलेल्या छायाचित्रकरांना केली. त्याच्या या फटकळ वागण्यामुळे अनेक छायाचित्र नाराज झाले आहेत.

काही हिंदी संकेतस्थळांच्या माहितीनुसार त्याच्या नखऱ्यांमुळे एका फॅशन शोमधूनही त्याला हटवण्यात आलं होतं. एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी हर्षवर्धनला विचारण्यात आलं होतं पण त्यानं त्यावेळी फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या. त्याच्या मागण्या पूर्ण करता करता आयोजकांच्या अक्षरश: नाकी नऊ आले होते. अखेर या शोमधून ऐनवेळी हर्षवर्धनला हटवण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 11:49 am

Web Title: harshvardhan kapoor tantrums at event
Next Stories
1 सलमानमुळे चित्रपटसृष्टीत आलेल्या ‘या’ अभिनेत्याला राधिकाने दिला मोलाचा सल्ला
2 ५० व्या दिवशीही वैभवशाली ‘पद्मावत’चीच जादू
3 ‘विरुष्का’प्रमाणेच पोझ देत फोटो काढणारं सेलिब्रिटी कपल सोशल मीडियावर ट्रोल
Just Now!
X