28 September 2020

News Flash

..म्हणून संजय दत्तने अचानक सोडली मुंबई

जाणून घ्या कारण...

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. संजय दत्तने कॅन्सरवर उपचार सुरु केले होते. दरम्यान संजू बाबा पत्नी मान्यता दत्तसोबत अचानक मुंबई सोडून परदेशात गेला असल्याचे समोर आले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत दुबईला रवाना झाला आहे. संजू बाबा त्याच्या मुलांना, शहरान आणि इकरा यांना मिस करत असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तो दुबईला गेला असल्याचे म्हटले आहे. संजय दत्त पुढचे सात ते दहा दिवस मुलांसोबत घालवणार असल्याचे म्हटले जात आहे.

PHOTOS : संजय दत्त राहत असलेले आलिशान घर पाहा आतून कसे दिसते

८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने त्याची भेट घेतली. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संजय दत्त लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 10:59 am

Web Title: here is reason why sanjay dutt left mumbai avb 95
Next Stories
1 ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची करोनावर मात
2 ‘हा तर देवाचा अपमान’; ओम प्रिंट असलेले कपडे परिधान केल्यामुळे अंकिता ट्रोल
3 Bigg Boss 14 : सलमान खान की सिद्धार्थ शुक्ला? नेमकं कोण करणार यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन?
Just Now!
X