सध्या करोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. यातच कलाविश्वातही रोजंदारीवर काम करणारे आणि पडद्यामागील कर्मचाऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिस्थिती सापडलेल्या गरजुंना बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने मदतीचा हात पुढे केला आहे.
हृतिकने जवळपास १०० बॅकग्राऊंड डान्सरला मदतीचा हात दिला आहे. हृतिकने गरजू बॅकग्राऊंड डान्सरच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले आहेत. या वृत्ताला प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को यांनीदेखील दुजोरा दिला आहे.
वाचा : हृतिकमुळे गरजूंच्या पोटात जाणार अन्नाचा कण; ‘एनजीओ’च्या माध्यमातून करतोय अशी मदत
हृतिकने मदत केल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत.अनेक डान्सर भाड्याच्या घरात राहतात त्यामुळे या काळात काहींचे घरभाडे थकले आहे. तर काहींच्या घरातील व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अशांसाठी हृतिकने मदत केली आहे. दरम्यान, या काळात हृतिक विविध मार्गान गरजुंची मदत करत आहे. यापूर्वि त्याने जवळपास १.२ लाख जणांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 4:18 pm