News Flash

अखेरीस हृतिक वरमला!

गेले काही दिवस हृतिक रोशन आणि सलमान खान यांच्यामध्ये चालू असलेल्या वादविवादांवर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

| October 12, 2014 06:18 am

गेले काही दिवस हृतिक रोशन आणि सलमान खान यांच्यामध्ये चालू असलेल्या वादविवादांवर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्याच्याच एक भाग म्हणून ‘बँग बँग’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ह्रतिकने सलमानच्या बिग बॉस सकट इतर कोणत्याही टीव्ही शोजना जाणे टाळले होते. पण आता बिग बॉसच्या घरात दाखल होतं, आपल्या आणि समलमानच्या मध्ये चालू असलेल्या सर्वच ताणतणावांच्या चर्चा ह्रतिकने शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
हृतिक रोशनने ‘बँग बँग’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोणतीही कसूर सोडली नव्हती. इतकेच नव्हे तर, त्याने बॉलिवूडमधील शाहरुख खान, रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा यांसारख्या कित्येक कलाकारांना ट्विटरवरून ‘बँग बँग चॅलेंज’ देत या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये समाविष्ट करुन घेतले होते. पण त्यावेळी ‘टीव्हीवर कोणत्याही शोवर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जाणार नाही,’ हे मात्र त्याने जाहिर केले होते.
या सगळ्यामागे हृतिक आणि सलमानमधील चालू असलेला वाद हे एक कारण असल्याचे सांगितले जात होते. कारण सध्या टीव्हीवर सलमानचा ‘बिग बॉस’ हा शो सुरु आहे, म्हणूनच सलमानला टाळण्यासाठी हृतिकने टीव्ही शोजमध्ये टाळत असल्याचे तर्क लावले जात होते. पण या अफवांना नाकारत, ह्रतिकने सलमानच्या शोला हजेरी तर लावलीच आणि इतकेच नव्हे तर, त्याच्यासाठी एक गुप्त संदेशही ठेवला आहे.
शोमध्ये आलेल्या हृतिकने सलमानला उद्देशून सांगितले की, ‘माझ्या वडीलांनी चित्रपटासाठी पहिल्यांदा माझी निवड केली, तेव्हा मला सर्वप्रथम माझ्या शरीरयष्टीवर लक्ष द्यावे लागले होते. त्यावेळी एका मार्गदर्शकाच्या भुमिकेतून सलमान माझ्या मदतीस धावून आला होता. त्याने स्वत:च्या जिमच्या चाव्या माझ्या स्वाधीन करत, ‘आता हे जिम तुझे आहे, तुला हवे ते कर’ असे सांगितले होते.’ इतकेच नव्हे तर, त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत, व्यायामासाठी सलमान आपल्याला सकाळी २ वाजता उठवत असे, आणि आपणही त्याची आज्ञा मानत नियमित व्यायाम करत असू, असे सांगितले.
ह्रतिकने इतर बॉलिवूड कलाकारांसोबत सलमानलाही  ‘बँग बँग चॅलेंज’ दिले होते, पण सलमान ते चॅलेंज अजूनही पुर्ण केले नाही, त्याला याची आठवण करुन देताना, ‘सलमान हे चॅलेंज पुर्ण केले नाहीस, तर मात्र मी तूझ्यावर रागवीन आणि तुला डान्सस्टेप्स शिकवणार नाही,’ असे सांगितले. पण असे असले तरी, हृतिकने शनिवारी-रविवारी शोमध्ये जाऊन सलमानची भेट का घेतली नाही, हा प्रश्न मात्र कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 6:18 am

Web Title: hrithik roshan salman khan patch up
Next Stories
1 जॅकलिनचे पुढच्या वर्षी चार चित्रपट
2 ‘इंडियावाले’च्या मंचावर शाहरुखची भन्नाट चाहत्यांशी भेट
3 ‘झी मराठी’ पुरस्कारांवर ‘जुळून येती रेशीमगाठी’चे वर्चस्व
Just Now!
X