26 September 2020

News Flash

पहा व्हिडिओ : ‘क्रिश-३’ च्या फर्स्ट लूकचे ऋतिक रोशनच्या हस्ते अनावरण

बॉलीवूड सुपरस्टार ऋतिक रोशन याने आपल्या बहुचर्चित सुपरहिरो चित्रपटाच्या श्रेणीतील 'क्रिश-३' या चित्रपटाच्या प्रोमोचे आज सोशन नेटवर्कींग साईटवर अनावरण केले.

| June 27, 2013 06:02 am

बॉलीवूड सुपरस्टार ऋतिक रोशन याने आपल्या बहुचर्चित सुपरहिरो चित्रपटाच्या श्रेणीतील ‘क्रिश-३’ या चित्रपटाच्या प्रोमोचे आज सोशन नेटवर्कींग साईटवर अनावरण केले.

२००६ साली आलेल्या ‘क्रिश’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सुपरहिरोचा लूक कसा असेल याची ऋतिकच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती. विज्ञान तंत्रज्ञानावर आधारीत या चित्रपटाच्या डिजिटल पोस्टरच्या अनावरणापूर्वी ऋतिक रोशनने चाहत्यांसोबत व्हिडिओ चॅटद्वारे संवाद साधला.

याआधी अनावरण झालेल्या पोस्टरमध्ये चाहत्यांना फक्त सुपरहिरोची झलक पहायला मिळाली होती. मात्र नव्याने अनावरण करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एका बाजूने चेह-यावर मास्क चढवलेला ऋतिक दिसत असल्याने दाखवून उत्सुकता अधिक वाढवण्यात आली आहे.
ऋतिकचे वडिल आणि निर्माते, दिग्दर्शक राकेश रोशन शाहरूख खान आणि दीपिका पदुकोन यांच्यासोबत ‘क्रिश-३’ च्या ट्रेलरचे अनावरण करणार आहेत. या दोघांच्या प्रमुख भूमिका असेलेला चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 

राकेश रोशन दिग्दर्शित आणि निर्मित ‘क्रिश-३’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय आणि शरयू चौहान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 6:02 am

Web Title: hrithik roshan unveils the first look of krrish 3
Next Stories
1 सलमानच्या बुटात करणवीर!
2 लव रंजन बनवणार ‘प्यार का पंचनामा’चा सिक्वल
3 स्वत:शीच स्पर्धा करण्यावर रणवीरचा विश्वास
Just Now!
X