01 October 2020

News Flash

एन्जेलिना जॉलीच्या पदपथावर हुमा कुरेशी

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला हॉलीवूड अभिनेत्री एन्जेलिना जॉलीच्या पदपथावर चालण्याची इच्छा आहे.

| October 17, 2014 12:14 pm

हुमा कुरेशी

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीला हॉलीवूड अभिनेत्री एन्जेलिना जॉलीच्या पदपथावर चालण्याची इच्छा आहे.
‘जिया’, ‘गर्ल, इंटरप्टेड’, ‘लारा क्रोफ्ट: टॉम्ब रेडर’ या चित्रपटांनंतर ३९ वर्षीय एन्जेलिनाने ‘इन द लॅन्ड ऑफ ब्लड अॅण्ड हनी’ या चित्रपटाने २०११ साली दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. एन्जेलिनापासून प्रभावित झालेली २८ वर्षीय हुमा म्हणाली की, आता मी चित्रपट दिग्दर्शन करणार नाही. बहुतेक वयाच्या ५५व्या वर्षी मी याचा विचार करेन. एन्जेलिना जॉलीच्या पाऊलांवर पाऊल टाकण्याचा मी विचार करतेय. तिचा भाऊ साकीब सलीमसोबत सह दिग्दर्शन करण्यास तिला आवडेल का? असे विचारले असता ती म्हणाली, माझ्या भावासोबत सह दिग्दर्शन करणे शक्य नाही. आमच्या दोघांचीही अतिशय भिन्न मते आहेत. बहुदा आम्ही एकत्र चित्रपट काम करू. असं होऊ शकतं आणि ते मलाही आवडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2014 12:14 pm

Web Title: huma qureshi wants to go the angelina jolie way
Next Stories
1 ….जेव्हा ऐश्वर्या आणि हेलन यांची भेट होते
2 कपिल शर्मा सिमरन कौरबरोबर रोमान्स करताना दिसणार
3 फ्रान्स आणि इराणी चित्रपटांवर दीपिकाचे लक्ष
Just Now!
X