10 December 2019

News Flash

मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही-श्रुती हसन

श्रुती हसनकडून टीकाकारांना शब्दांचा मार!

मी कोणालाही उत्तर देण्यास बांधील नाही… चेहरा माझा आहे मी त्याचं काहीही करेन.. हे परखड उत्तर दिलं आहे अभिनेत्री श्रुती हसननं. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या नावाने बोटं मोडणाऱ्या टीकाकारांना तिनं अशाच शब्दात उत्तर दिलं आहे. दोन दिवसांपासून श्रुती हसननं ओठांची सर्जरी केल्याची बातमी सोशल मीडियावर फिरते आहे.

अनेक नेटिझन्सनी श्रुतीचे आधीचे आणि नंतरचे फोटो टाकत तिच्यावर टीका केली आहे. यावर मिड-डे या वृत्तपत्राशी बोलताना श्रुती हसनने टीका करणाऱ्यांना शाब्दिक फटके दिले आहेत. तिच्या ओठांची सर्जरी झाली की नाही यावर मात्र तिनं कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. मात्र सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेबाबत तिला विचारलं असता, माझा चेहरा आहे, माझं शरीर आहे मी सर्जरी करेन किंवा नाही करणार.. मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. तसंच मला लोकांनाी सोशल मीडियावर काय लिहीलं आहे त्यानं फरक पडत नाही. असंही श्रुती हसननं मिड-डे या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

तिच्या कथितओठांच्या सर्जरीवरून सोशल मीडिया आणि ट्विटरवर तिच्यावर चांगलीच टीका झाली होती. मात्र हा सगळा प्रकार बहन होगी तेरी या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी घडला असावा असाही अंदाज व्यक्त होतो आहे. श्रुती हसन ही दाक्षिणात्य सिनेमातली नावाजलेली अभिनेत्री आहे. तसंच हिंदी सिनेसृष्टीतही श्रुतीचे अनेक फॅन्स आहेत. मात्र ओठांच्या सर्जरीवरून तिनं आपल्या टीकाकारांना चांगलंच झापलं आहे.

First Published on June 6, 2017 9:41 pm

Web Title: i am not answerable to anyone shruti
Just Now!
X