अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांचं नातं जगजाहीर आहे. आतापर्यंत या दोघांनी खुलेपणाने त्याची कबुली दिली नाही. मात्र अनिल कपूर यांनी नुकतंच टायगर आणि दिशाच्या रिलेशनबद्दल ‘द कपिल शर्मा शो’मध्ये वक्तव्य केलं आहे.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलने अनिल कपूर यांना एक प्रश्न विचारला. “तुम्हाला कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या स्वयंपाकघरातून त्यांची रेसिपी चोरायला आवडेल”, असा प्रश्न कपिलने अनिल कपूर यांना विचारला होता. याला उत्तर देताना अनिल कपूर पटकन म्हणाले, “टायगर श्रॉफ.” “टायगरच्या दिशासोबत एकाच चित्रपटात काम करताना माझ्या लक्षात आलं की मला टायगरसोबत काम करण्याची संधीच मिळाली नाही,” असंही ते पुढे म्हणतात. पण आपल्या तोंडून अनवधानाने दिशा आणि टायगरचं एकत्र नाव निघालं हे कळताच सारवासारव करत त्यांनी सांगितलं, “टायगर आणि दिशा हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. म्हणून मी दिशाच्या डाएटची चोरी करेन.”
View this post on Instagram
आणखी वाचा- ‘जर मी दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित झाले तर…’; दीपिकाने रणवीरला आधीच केलं होतं स्पष्ट
दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत असून अनेक कार्यक्रमांमध्ये आणि इतर ठिकाणीही या दोघांना नेहमी एकत्र पाहिलं गेलंय. काही दिवसांपूर्वी हे दोघं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मालदिवला गेले होते.