News Flash

वडिलांच्या आठवणीत इरफान खानच्या मुलाला स्टेजवरच कोसळले रडू

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातला व्हिडिओ होत आहे व्हायरल

अभिनेता इरफान खान यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्याला आता अनेक महिने लोटले असले तरी इरफान यांच्याबद्दल वाटणारं प्रेम, त्यांना दिला जाणारा सन्मान अजूनही कमी झालेला नाही. २०२१च्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान यांना खास सलामी देण्यात आली. त्यांना एका विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. इरफान यांच्या मुलाने या पुरस्काराचा स्वीकार केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

फिल्मफेअऱकडून देण्यात येणारा हा पुरस्कार इरफान यांच्या वतीने त्यांचा मुलगा बाबिल याने स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना वडिलांच्या आठवणीने बाबिल भावूक झाला आणि त्याला स्टेजवरचं रडू कोसळलं. या पुरस्कार सोहळ्याचा निवेदक राजकुमार राव यालाही अश्रू अनावर झाले. अभिनेता आयुष्मान खुरानाने इरफान यांच्यासाठी छोटीशी कविताही सादर केली. हे ऐकून बाबिल भावूक झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

बाबिलने इरफान यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला आणि आपण आपल्या वडिलांची मान गर्वाने उंचावणार असल्याचंही सांगितलं. भारतीय सिनेमाला सर्वोच्च शिखरावर पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही तो म्हणाला. हे ऐकताना उपस्थित कलाकारही भावूक झाले.

गेल्या वर्षी २९ एप्रिलला इरफान खान यांचं कॅन्सर या आजाराने निधन झालं. ते बराच काळ कॅन्सरशी लढत होते. त्यांनी पीकू, पान सिंह तोमर अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

त्यांचा मुलगा बाबिल कायम आपल्या वडिलांबद्दल काही ना काहीतरी पोस्ट करत असतो. तो कायम आपल्या वडिलांच्या आठवणी जागवत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 4:13 pm

Web Title: irrfan khans son babil is crying in the memory of his father vsk 98
Next Stories
1 आणि बर्थडे केक कापतानाच स्वराला रडू कोसळलं, व्हिडीओ व्हायरल
2 कुणीतरी येणार गं…‘रंग माझा वेगळा’ मालिकेत रंगणार दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
3 ‘शाहरुख, सलमान आणि आमिर नाही तर मीच राहणार नंबर वन’, अक्षय म्हणाला…
Just Now!
X