News Flash

…म्हणून तानाजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.

अजय देवगणचा ‘तानाजी’ चित्रपट पुढील वर्षांत प्रदर्शित होत आहे. ‘स्वराज्य’निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कतृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे होय. तानाजींच्या पराक्रमाची कथा ही रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजयच्या सर्वांत महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच बदलली आहे यामागचं कारणही समोर आलं आहे.

अजयसाठी हा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अनेक व्हीएफएक्स आहे. व्हीएफएक्समुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचं म्हटलं जात आहे. व्हीएफएक्ससाठी वेळ लागणार आहे म्हणूनच नोव्हेंबरमधली प्रदर्शनाची तारीख बदलून ती जानेवारी २०२० करण्यात आली आहे.

प्रदर्शनाच्या तारखेबरोबरच चित्रपटाच्या नावातही बदल करण्यात आला आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ असं चित्रपटाचं नाव पूर्वी ठेवण्यात आलं होतं मात्र आता चित्रपटाचं नाव बदलून ते ‘तानाजी’ असं ठेवण्यात आलं आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. अजयसोबतच सैफ अली खानही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसेल असं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 5:41 pm

Web Title: is this why ajay devgn postponed the release date of tanhaji
Next Stories
1 ही असतील ‘सेक्रेड गेम्स २’च्या एपिसोड्सची नावं?
2 भन्साळींनी ‘पद्मावत’साठी माझ्या नावाचा विचार केला होता, कंगनाचा दावा
3 …त्या घटनेमुळे राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील मैत्री कायमची संपली
Just Now!
X