News Flash

….म्हणून सेटवर ‘इश्क सुभान अल्लाह’फेम अभिनेत्रीचे डोळे पाणावले

मालिकेच्या चित्रीकरणाला झाली सुरुवात

लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यानंतर कलाविश्वातील कलाकारांची आणि तंत्रज्ञांची रेलचेल सुरु झाली आहे. हळूहळू करत अनेक मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मराठीसह आता हिंदी मालिकांच्या चित्रीकरणानेही जोर धरला असून काही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्येच ‘इश्क सुभान अल्लाह’ या मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. परंतु, सेटवर पुन्हा परतल्यानंतर अभिनेत्री आएशा सिंह हिला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

आखून दिलेल्या नियमांचं पालन करत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून मालिकेतील कलाकार सेटवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पुन्हा काम सुरु करताना आएशाला रडू कोसळलं. तसंच बऱ्याच काळानंतर आएशा पुन्हा झारा अहमद या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

“इतक्या महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर पुन्हा इश्क सुभान अल्लाहच्या चित्रीकरणं सुरु होणं हे खरंच माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे. या सेटवरील इतक्या आठवणी आहेत की सेटवर पोहोचल्यानंतर मी पुन्हा माझ्या घरीच आले असं मला वाटलं. सेटवर आल्यानंतर जुन्या आठवणींनी माझ्या मनात एकच गर्दी केली. त्यामुळे मला थोडंसं गहिवरुन आलं. सध्या यातले अनेक चेहरे माझ्यासाठी नवीन आहेत त्यामुळे मी माझ्या जुन्या सहकार्यांना खूप मिस करते. यात फक्त अदनान माझ्या ओळखीचा आहे. पण ही नवीन सुरुवात सुद्धा छान वाटती, असं आएशा म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 4:16 pm

Web Title: ishq subhan allah hindi serial shooting began ssj 93
Next Stories
1 झाली रे झाली नऊ वर्षे झाली! जयकांत शिक्रे ‘सिंघम’च्या आठवणी जागवत म्हणाला…
2 छोट्या पडद्यावरील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का?
3 ‘टायगर सीरिज’च्या तिसऱ्या चित्रपटासाठी सलमान-कबीर खान करणार एकत्र काम?
Just Now!
X