09 August 2020

News Flash

Video: फोनवर बोलण्यात गुंग असणाऱ्या गायकाच्या हातात गर्लफ्रेंडने ठेवला साप

व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कच व्हाल....

जेसन डेरूलो अमेरिकेतील लोकप्रिय गायक, संगीतकार आहे. जेसन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो आपल्या गाण्यांच्या व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो कुठल्याही गाण्यामुळे नव्हे तर चक्क एका एनाकोंडा सापामुळे चर्चेत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – टीव्ही मालिकेचा World Record; १५ दिवसांमध्ये मिळवले १० कोटी व्हूज

 

View this post on Instagram

 

People will literally grab anything when they’re on the phone! What would your reaction be? @jasonderulo (tik tok @ jenafrumes)

A post shared by JENA (@jenafrumes) on

अवश्य पाहा – आणखी एका ‘पॉर्नस्टार’ची बॉलिवूडमध्ये एण्ट्री; राम गोपाल वर्मांच्या चित्रपटात करणार काम

जेसनने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो फोनवर बोलताना दिसत आहे. तेवढ्यात त्याची गर्लफ्रेंड जेन फ्रूम्स त्याच्या हातात बर्फाने भरलेला एक ग्लास देते. त्यानंतर साबणाच्या पाण्याने भरलेली एक बाटली देते. जेसन फोनवर बोलण्यात इतका गुंग आहे की जेनने पुढे केलेली प्रत्येक गोष्ट तो आपल्या हातात घेत आहे. तेवढ्यात ती जेसनच्या हातात एनाकोंडा साप देते. असा हा गंमतीशीर व्हिडीओ आहे.

जेसनला साप खुप आवडतात. त्याला सर्पमित्र म्हणूनही ओळखले जाते. व्हिडीओमध्ये दिसणारा हा त्याचा पाळीव साप आहे. यापूर्वी त्याने या सोपासोबत अनेक व्हिडीओ तयार केले आहेत. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 5:12 pm

Web Title: jason derulo girlfriend jena frumes tricks him into holding snake mppg 94
Next Stories
1 …म्हणून सलमान मुंबईला येऊन काही तासांतच पनवेलच्या फार्महाऊसवर परतला
2 अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं, मुंबई पोलिसांसाठी खास आमरस-पुरीच्या जेवणाचा बेत
3 “या चित्रपटामुळे अनन्या होईल देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री”; निर्मातीचा अजब दावा
Just Now!
X