बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाने एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. नुकताच जूही चावलाने एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जूहीच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीचा आहे. यावेळी जूही सेटवर तिचे डायलॉग सारखे विसरत असल्याचा खुलासा तिने केला आहे. १९८७ सालामध्ये ‘बहादुर शाह जफर’ या मालिकेत जूहीने गेस्ट अपीयरेंस केला हातो तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ जूहीच्या फॅन क्लबने शेअर केल्यानंतर जूहीने देखील व्हिडीओ शेअर करत एक खास किस्सा सांगितला आहे.

१९८७ सालामधील ‘बहादुर शाह जफर’ या मालिकेत जूहीने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. मात्र यावेळी जूही इंडस्ट्रीत नवी असल्याने ती खूपच नर्वस असल्याचं तिने म्हंटलं आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणाली, ” बी आर चोप्रा यांच्या मालिकेत मला एक महत्वाचा गेस्ट रोल मिळाला होता. मला आठवतंय तो शूटिंगचा पहिला दिवस होता. मी नविनच असल्याने नर्वस होते आणि शॉटच्या वेळी माझे डायलॉग सारखे विसरत होते. रवि चोपडा या मालिकेचं दिग्दर्शक होते. यावेळी त्यांनी संयम कायम ठेवला आणि ते मलादेखील धीर देत होते.” असं जूहीने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

हे देखील वाचा: “तू घरी कधी येतोयस?”; दीपिका पदूकोणच्या प्रश्नावर रणवीर सिंहने दिलं ‘हे’ उत्तर

 

View this post on Instagram

 

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

हे देखील वाचा: ‘बिग बॉस १५’साठी सलमान खानची फी माहितेय का?, मानधन ऐकून डोळे चक्रावतील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे जूही म्हणाली, ” हे शूट १९८७ सालातील आहे. जे मी नंतर पाहिलचं नव्हत. आज एवढ्या वर्षांनी मी पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिलं. मी स्वत: हैराण झाले की या ओळी मी कश्या बोलले. मी काय केलं याची मला काहीच कल्पना नव्हती. बी आर चोप्रा यांनी माझ्यात नेमकं काय पाहिलं. त्यांनी मला का कास्ट केलं आणि आज मी हे पाहत आहे.” असं म्हणत जूहीने तिचाच जुना व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला आश्चर्य वाटल्याचं सांगितलं आहे.