News Flash

अभिनेत्याने केली सुशांतच्या बायोपिकची घोषणा; बॉलिवूडमधील घराणेशाहीला करणार एक्सपोज

सुशांतला न्याय देण्यासाठी 'हा' अभिनेता तयार करणार चित्रपट

सुशांतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. दरम्यान त्याच्या आयुष्यावर अभिनेता कमाल आर. खान एक चित्रपट तयार करणार आहे. सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना या चित्रपटाद्वारे तो एक्सपोज करणार आहे.

“सुशांत सिंह राजपुतवर मी लवकरच एक बायोपिक तयार करणार आहे. सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या लोकांना मी या चित्रपटाद्वारे जगासमोर आणणार आहे. मी बॉलिवूडचा द्वेष करतो. सुशांतला न्याय मिळायलाच पाहिजे.” अशा आशयाचं ट्विट कमाल खानने केलं आहे.

कमाल खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीवर वारंवार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कमालचे हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 7:30 pm

Web Title: kamaal r khan announces he would produce biopic on sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 सुशांतच्या आत्महत्येनंतर साहिल खानने सांगितलं बॉलिवूड सोडण्यामागचं कारण
2 शाहरुख-सलमान पैकी एकानं माझं करिअर संपवलं; अभिनेत्याचा धक्कादायक आरोप
3 अभिषेकचा नवा अंदाज; ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित
Just Now!
X