28 February 2021

News Flash

सुशांतच्या वाढदिवशी कंगनानं यशराज, महेश भट्ट, करण जोहरवर साधला निशाणा

कंगनाने एका पाठोपाठ तिन ट्वीट केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला. पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न अनेकांना आजही सतावत आहे. आज २१ जानेवारी रोजी सुशांतचा वाढदिवस. सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येक जण आज त्याच्या आठवणींमध्ये भावूक झाले आहेत. दरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने देखील ट्वीट केले. पण तिने या ट्वीटच्या माध्यमातून यशराज, महेश भट्ट आणि करण जोहर यांच्यावर निशाणा साधला आहे.

कंगनाने तिच्या ट्विटटर अकाऊंटवर सुशांत सिंह राजपूतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘प्रिय सुशांत, मूव्ही माफियांनी तुला त्रास दिला, तू सोशल मीडियावर अनेकदा मदतीसाठी विनंती केलीस पण मी तुझी मदत करु शकले नाही याचे मला दु:ख होते. तू या मूव्ही माफियांचे टॉर्चर सहन करण्यास सक्षम आहेस असे मी गृहीत धरायला नको होते’ या आशयाचे ट्वीट कंगानाने केले आहे.

त्यानंतर तिने आणखी दोन ट्वीट केले आहेत. या ट्वीटमध्ये तिने करण जोहर, यशराज फिल्मस आणि महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर कंगनाचे हे ट्वीट तुफान व्हायरल झाले असून चर्चेत आहे. अनेकांनी कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 12:59 pm

Web Title: kangana ranaut again target yash raj mahesh bhatt and karan johar on sushant singh rajput birthday avb 95
Next Stories
1 ‘या’ चित्रपटापुढे करोनाही फिका, पहिल्या आठवड्यात कमावले इतके कोटी
2 ‘गंदी बात 6’ चा ट्रेलर प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत
3 ‘त्या पार्टीत आमची भेट झाली अन्…’; अशी सुरू झाली रिया-सुशांतची लव्हस्टोरी
Just Now!
X