News Flash

कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेला कर्नाटकात अटक; लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

मेकअप आर्टिस्टवर लैगिंक शोषण आणि अत्याचार केल्याचा बॉडीगार्डवर आरोप आहे.

(संग्रहित छायाचित्र। कंगना इन्स्टा)

मुंबईतील मेकअप आर्टिस्टवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली कंगना रणौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने कुमारचा तपास लावण्यासाठी त्याचं कर्नाटकातील गावं गाठलं. कर्नाटकातील हेगडाहल्ली इथून कुमारला ताब्यात घेण्यात आलं आहे. कुमार लग्न करण्यासाठीच त्याच्या गावी गेला होता.

कुमार गेल्या १० दिवसांपासून फरार होता. शिवाय २८ एप्रिलपासूनच त्याचा फोन बंद होता. त्यामुळे पोलिस आणि त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये असलेली पीडित महिलेला देखईल त्याला संपर्क करता आला नाही. कर्नाटकात तपासासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांनी पीडित महिला आणि तिची मैत्रीण दिव्या कोटीयान यांनादेखील सोबत कर्नाटकात नेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मूळ गावी  तपास केला असता कुमार हेगडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करून कुमार हेगडेला मुंबईत आणलं आहे.

कंगनाच्या बाडीगार्डवर हे आरोप आहेत?

मुंबईतील एका मेकअप आर्टिस्ट महिलेच्या तक्रारीनंतर कुमार हेगडे याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुमार हेगडेवर लग्नाचं आमिष दाखवून अनेकवेळ जबरदस्ती बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि ५० हजार रुपये घेतल्याचा केल्याचा आरोप आहे.आरोप करणारी महिला मुंबईत मेकअप आर्टिस्टचं काम करते. तक्रारकर्त्या महिलेची वैद्यकीय चाचणी आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर डीएन नगर पोलिसांनी १९ मे रोजी रात्री गुन्हा नोंदवला.

फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार कुमार हेगडे (कंगनाचा बॉडीगार्ड) तिला २०१३ मध्ये भेटला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये हेडगेने तिला प्रपोज केलं. तिने होकार दिल्यानंतर हेगडे अधूनमधून तिच्या फ्लॅटवर यायचा आणि बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवायचा. अनेकवेळा त्याने जबरदस्ती केली. २७ एप्रिल रोजी हेगडे आपल्या घरातून ५० हजार रुपये घेऊन पळाल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
यानंतर कुमार हेगडेच्या आईने लग्नासाठी आपल्या मुलाला (कुमार हेगडेवर) जबरदस्ती करून नको म्हणून पीडित महिलेला धमकी दिली होती, असंही माहितीतून समोर आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 11:06 am

Web Title: kangana ranaut bodyguard kumar hegade arrested in karnataka by mumbai police in rape charges kpw 89
Next Stories
1 अजय देवगणने खरेदी केला आलिशान बंगला ; बिग बींच्या नव्या घराहून दुप्पट किंमत!
2 टार्झनची भूमिका साकारणाऱ्या जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू
3 “मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं गेलं”, इंडियन आयडल शोबद्दल सुनिधी चौहानचा मोठा खुलासा
Just Now!
X