आपल्या रोखठोक मतांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना रणौतनं पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. MeToo सारख्या गंभीर प्रश्नावर करण आणि शबाना आझमी सारखे लोक अद्यापही मौन बाळगून का आहेत असा प्रश्न तिनं विचारला आहे.
‘करण जोहर, शबाना आझमी अजून आहेत कुठे? त्यांनी पुढे येऊन मी टु प्रकरणावर बोललं पाहिजे. करण जोहर तर जिममध्ये कसे कपडे घालावे, एअरपोर्टवर कसा पेहराव असावा यासारख्या फाल्तू गोष्टींवर दहा वेळा मतप्रदर्शन करत असतो. मग या मुद्द्यावर अद्यापही तो गप्प का? या इण्डस्ट्रीमुळे त्या दोघांचंही पोट भरतं मग मी टु सारख्या गंभीर विषयावर अजूनही ते मौन बाळगून का आहेत.’ असा सवाल तिनं विचारला आहे.
#MeToo : विकास बहलच्या पत्नीला कंगनाचं सडेतोड उत्तर
काही दिवसांपूर्वी कंगनानं दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर देखील लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. तसेच महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या हृतिक रोशन सारख्या अभिनेत्यासोबत काम करणंही बॉलिवूडमधल्या कलाकारांनी थांबवलं पाहिजे असं कंगना एका मुलाखतीत म्हणाली होती.
#MeToo: हृतिकसोबत कोणीही काम करु नये – कंगना रणौत
मी टू सारख्या गंभीर मुद्द्यावर तुम्ही ठोस भूमिका घेऊ शकत नाही, मग तुम्ही स्वत:ला या इण्डस्ट्रीचे महिसा का म्हणवून घेता असं म्हणतं तिनं बॉलिवूडधल्या इतरही कलाकारांना तिनं फटकारलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2018 1:15 pm