26 November 2020

News Flash

मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर ‘आलिया भट्ट’ला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

मृत्यूनंतर सुशांतचा फोन कोण वापरतंय? कंगनाने केले अभिनेत्रीवर गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली. दरम्यान अभिनेत्री कंगना रनौतने रियावर आणखी काही आरोप केले आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याच्या फोनचा वापर रिया करत असल्याचा दावा कंगनाने केला आहे. तसेच हा दावा सिद्ध करण्यासाठी तिने एक पुरावा देखील सादर केला आहे.

अवश्य पाहा – “सलमानच्या घरात तीन महिने राहिल्यानंतर…”; अभिनेत्याने उडवली जॅकलीनची खिल्ली

कंगनाने आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन एक स्क्रिन शॉट पोस्ट केला आहे. या स्क्रिन शॉटमध्ये सुशांत ट्विटरवर आलिया भट्टला फॉलो करु लागल्याचं नोटिफिकेशन दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हे नोटिफिकेशन २९ जुलैचं आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा फोन कोण वापरतंय? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला. “आता तर सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. रियाकडे सुशांतचे सर्व गॅजेट्स आहेत. कदाचित महेश भट्ट यांच्या आदेशाखालीच तिने आलिया भट्टला फॉलो केलं असेल. सुशांतचे अनेक पोस्ट डिलिट देखील करण्यात आले होतं.” अशा आशयाचं ट्विट या स्क्रिनशॉटवर कंगनाने केलं आहे.

अवश्य पाहा – करोनाची भीती; ‘या’ अभिनेत्रीच्या घरातच तयार केला मालिकेचा सेट

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जात आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी, भाजपा खासदार निशिकांत दुबे, पप्पू यादव, तेजस्वी यादव, अभिनेता शेखर सूमन तसंच रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. रिया चक्रवर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्रही लिहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 4:46 pm

Web Title: kangana ranaut rhea chakraborty sushant singh rajput mppg 94
Next Stories
1 नेहा कक्कर दिसणार पुन्हा एकदा ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या मंचावर
2 ‘बिग बॉस’मध्ये जाणार का? तारक मेहता फेम मुनमुन म्हणाली…
3 बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्षमानसी’ कवितेला स्वप्नील बांदोडकरच्या आवाजाचा नवा साज
Just Now!
X