News Flash

‘थलायवी’च्या गाण्यावर करणचा डान्स? एडिटेड व्हिडीओ शेअर करत कंगना, म्हणाली….

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. कंगना आणि बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर यांच्यातील मतभेद तर आपल्या सगळ्यांना माहितच आहेत. सगळ्यात आधी कंगनाने करण वर घराणेशाहीचा आरोप लावला होता. त्यानंतर कंगना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्याच्यावर टीका करताना दिसते. आता कंगनाने करणचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

कंगनाने ट्विटर वर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने कंगनाला टॅग करत ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहताच क्षणी कंगनाने ते ट्विट रिट्विट करत यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत करण एका कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. तर कंगनाच्या चाहत्यांनी तिच्या आगामी चित्रपट ‘थलायवी’मधील चली-चली हे गाणं त्या व्हिडीओत अॅड केलं आहे. करणचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. मात्र, कंगनाच्या चाहत्यांनी करणला ट्रोल करण्यासाठी त्याचा हा व्हिडीओ एडिट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “आता पर्यंतचा सगळ्यात चांगला व्हिडीओ #ChaliChaliChallenge” असे हॅशटॅग वापरत कंगनाने ट्विट केले आहे.

कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट २३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. या व्यतिरिक्त कंगनाकडे ‘धाडक’ आणि ‘तेजस’ हे चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 2:16 pm

Web Title: kangana ranaut shares an edited video of karan johar dancing on her thalaivi song dcp 98
Next Stories
1 फन अनलिमिटेड; देशमुख वहिनी जेनेलियाची कांचीसोबत धमाल
2 ‘मेजर’ सिनेमातील सई मांजरेकरचा फर्स्ट लूक; क्यूट लूकवर चाहते फिदा
3 ‘मास्टर’चा रिमेक, सलमान साकारणार विजयची भूमिका?
Just Now!
X