बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने घराणेशाहीला कंटाळून इतके टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्या निधनानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले तर काहींनी बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले. अभिनेत्री कंगणा रणौतने देखील घराणेशाहीवर वक्तव्य केले होते. आता छोट्या पडद्यावरील अभिनेता करण पटेलने अप्रत्यक्षपणे कंगनावर निशाणा साधला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये करण पटेलने सुशांतच्या निधनानंतर घराणेशाही वाद सुरु का झाला याचे कारण कळाले नसल्याचे म्हटले आहे. त्याने कंगनाचे नाव न घेता ‘सध्या एक अभिनेत्री घराणेशाही विषयी बोलत आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. मग तिने सुशांतला तिच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी का नाही दिली. मी तिला कधीच नविन दिग्दर्शक किंवा अभिनेत्यासोबत काम करताना पाहिले नाही’ असे म्हटले.
‘खरच तिचे मन इतके मोठे आहे आणि तिने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे तर तिने नविन कलाकार, दिग्दर्शक यांना संधी द्यायला हवी. तसेच तिने एखाद्या नव्या अभिनेत्यासोबत चित्रपटात हिरोइन म्हणून काम करायला हवे. जेव्हा ती हे सगळं करेल तेव्हा आपण बोलू आणि आम्ही तुझे ऐकू’ असे त्याने पुढे म्हटले आहे.
कंगना रणौतची कुटुंबीयांसोबत पिकनिक, पाहा फोटो
‘तुझे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे. तुझी बहीण तुझा बिझनेस सांभाळते. मग तू नविन मुलांना तेथे काम करण्याची संधी का नाही देत’ असे करणने म्हटले आहे. करणने अप्रत्यक्षपणे कंगनाला सुनावले असल्याचे म्हटले जात आहे.