News Flash

नव्या जाहिरातीमुळे सैफ-करीना चर्चेत; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

जाणून घ्या, सैफ-करीनाची का उडविली जाते खिल्ली

कलाविश्वातील लोकप्रिय आणि सतत चर्चेत राहणारी जोडी म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर-खान. अनेक चित्रपटांसोबत जाहिरातींमध्ये झळकलेली ही जोडी सध्या त्यांच्या एका नव्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच ही जोडी एका पाण्याच्या टाकीची जाहिरात करताना दिसून आले होते. मात्र या जाहिरातीत त्या दोघांमध्ये  दाखविण्यात आलेल्या संवादाची अनेकांनी खिल्ली उडविली आहे.

सध्या सोशल मीडियावर सैफ आणि करीना झळकलेल्या या जाहिरातीची चर्चा होत असून अनेकांनी जगातील सगळ्यात मजेशीर जाहिरात असं म्हटलं आहे. तर अनेकांनी यावर काही मीम्सदेखील तयार केले आहेत.

बऱ्याच दिवसानंतर सैफ आणि करीना एकत्र एका जाहिरातीत झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या जोडीला एकत्र पाहून चाहत्यांना जरी आनंद झाला असला तरीदेखील त्यांच्यातील संवाद मात्र चाहत्यांना फारसा रुचलेला दिसत नाही. या जाहिरातीत दोघंही एकत्र जेवताना दिसत आहेत. यावेळी ,’खूप दिवस झाले आपण एकत्र मोठ्या पडद्यावर कामच केलं नाही’, असं सैफ करीनाला म्हणतो. त्यावर, ‘घरी पण रोमान्स, बाहेरपण तेच’, असं उत्तर करीना देते. त्यावर पटकन सैफ म्हणतो, ‘मग आपण एका पाण्याच्या टाकीच्या जाहिरातीत काम केलं पाहिजे’. यावर दोघांचंही एकमत होतं आणि जाहिरात संपते, असं या पाण्याच्या टाकीच्या जाहिरातीत दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांनी त्याची खिल्ली उडविली आहे.

दरम्यान, सैफ आणि करीनाने कुर्बान, एजंट विनोद, ओमकारा, टशन या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे या दोघांची ऑनस्क्रीन लोकांना प्रचंड आवडत असून त्यांच्या ऑफस्क्रीन जोडीलादेखील तितकीच पसंती मिळताना दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 11:22 am

Web Title: kareena kapoor and saif ali khan feature in a water tank commercial twitter trolled ssj 93
Next Stories
1 कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महेश भट्ट, करण जोहर सोशल मीडियावर ट्रेण्ड
2 बिग बींचे करोनाविषयी जागृती करणारे ‘ते’ होर्डिंग्स हटविले; कारण…
3 करोनोत्तर नाटय़सृष्टीस राजाश्रयाची निकड
Just Now!
X