News Flash

‘विवाहित व्यक्तीवर प्रेम करणार नाही’, हृतिकसोबतच्या अफेअरच्या चर्चांविषयी म्हणाली होती करीना

तिने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान पती सैफ अली खानसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. मात्र, लग्नाआधी करीनाचे नाव अनेक बॉलिवूड कलाकारांशी जोडण्यात आले होते. करिअरच्या सुरुवातीलाच करीनाचे नाव अभिनेता हृतिक रोशनशीही जोडण्यात आल होते. त्यांनी ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘यादे’ चित्रपटात सोबत काम केले आहे. त्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली होती. या दोघांच्या केमिस्ट्रिबद्दल करिनाने एका मुलाखतीत वक्तव्य केले होते.

त्यावेळी हृतिकचे अभिनेत्री सुजैन खानशी लग्न झाले होते. तरी देखील करीना आणि हृतिकच्या अफेयरच्या चर्चा सुरू होत्या. करीना हृतिकसाठी करिअर सोडण्यास तयार आहे असे देखील म्हटले जात होते.

२००२ मध्ये फिल्मफेअरला करीनाने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने हृतिकशी लिंकअपच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले होते. “अफेअरच्या चर्चांचा हृतिकच्या लग्नावर तर परिणाम होणार नाही ना याची मला सर्वात जास्त काळजी होती. आज माझे नाव हृतिकसोबत जोडले उद्या दुसर्‍या कोणत्या अभिनेत्यासोबत जोडले जाईल. जोपर्यंत मला सत्य माहिती आहे, तो पर्यंत मी ठीक आहे” असे करीना म्हणाली.

पुढे ती म्हणाली, माझ्या आणि हृतिकच्या लिंकअपच्या चर्चांमध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मी त्याच्यासाठी माझ करिअर सोडायला तयार आहे. मी कोणासाठी कधीच माझे करिअर सोडू शकत नाही. जर मला माझ्या जोडीदाराने कधी माझे करिअर सोडण्यास सांगितले तर मी त्याला सोडून निघून जाईन.

करीनाला सतत हृतिक बद्दल प्रश्न विचारले जात होते. ती वैतागून म्हणाली, ‘कृपाय मला असे प्रश्न विचारणे थांबवा. मी कोणत्याही विवाहित व्यक्तीच्या प्रेमात नाही आणि कधी पडणारही नाही. विवाहित पुरुषामुळे माझे करिअर खराब होईल.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 7:09 pm

Web Title: kareena kapoor talked about linkup rumores with hritik roshan dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘माझा होशील ना’, ‘कारभारी लयभारी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे महाएपिसोड
2 तैमूरच्या नावावरुन झालेल्या वादानंतर दुसऱ्या बाळाचे नाव काय ठेवणार? करीना म्हणते…
3 अभिनेत्रीनं करोना टेस्टचा व्हिडीओ केला शेअर; काही तासांत मिळाले लाखो व्हूज
Just Now!
X