मराठी संगीतरंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत ‘कट्यार काळजात घुसली’. पाच वर्षांपूर्वी या नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सुबोध भावे, शंकर महादेव अशा दिग्गजांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आणि हा चित्रपट तुफान लोकप्रिय झाला. नुकतीच या चित्रपटाला ५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली आहे.
“कट्यार प्रदर्शित होऊन ५ वर्ष झाली, या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत जो आनंद आमहाला मिळाला तोच आनंद आज ५ वर्षानंतरही मिळत आहे. निरागस सुरांशी जुळलेलं नात आजही कायम आहे! कट्यार वर भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप प्रेम. त्या सर्व दिग्गजांना विनम्र अभिवादन ज्यांच्यामुळे ही कलाकृती जन्मली आणि माझ्या कट्यारच्या संघाचे ही आभार आणि खूप प्रेम कारण त्यांच्या शिवाय हे स्वप्न सत्यात उतरलं नसतं”, अशी पोस्ट सुबोधने शेअर केली आहे.
दरम्यान, सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वरसारख्या कलाकारांच्या मांदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे कट्यार काळजात घुसलीच्या माध्यमातून शंकर महादेवन यांनी पहिल्यांदात अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं.